खाणमालकांना उत्खननासाठी प्रती टन २५0 रुपये
By Admin | Updated: November 11, 2015 00:56 IST2015-11-11T00:56:20+5:302015-11-11T00:56:30+5:30
पणजी : खाणमालकांना उत्खननासाठी प्रती टन २५0 रुपये याप्रमाणे ९२ कोटी रुपये आतापर्यंत फेडण्यात आले आहेत.

खाणमालकांना उत्खननासाठी प्रती टन २५0 रुपये
पणजी : खाणमालकांना उत्खननासाठी प्रती टन २५0 रुपये याप्रमाणे ९२ कोटी रुपये आतापर्यंत फेडण्यात आले आहेत. ७0 लाख टन खनिज आजपावेतो ई-लिलावात विक्रीस गेले असून त्यानुसार आणखी ८३ कोटी रुपये सरकार खाणमालकांना देणे आहे. ९0 लाख टन खनिज जेटी तसेच खाणींवर
अजून पडून आहे यामुळे नव्याने
खाण व्यवसाय सुरू करण्यातही अडचण येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खनिजाचा ई-लिलाव चालू आहे. आतापर्यंत तेरावा ई-लिलाव झाले आहेत. एकूण १६.५६ दशलक्ष टन लिलावासाठी उपलब्ध होते. त्यातील ७0 लाख टनच आतापर्यंत विकले गेले आहेत.
जागतिक बाजारपेठेत खनिजाचे दर उतरलेले आहेत. कमी ग्रेडच्या खनिजाला ग्राहक मिळत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेख समितीच्या निर्देशांनुसार प्रती टन ५00 रुपयांपेक्षा कमी दराने खनिज विकता येणार नाही. त्यामुळे ई-लिलावात कमीत कमी बोली ५00 रुपये लावावी लागते. दर कमी करून देण्यास परवानगी मिळावी, यासाठी सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत ई-लिलावातून ८१८ कोटी रुपये प्राप्त केले आहेत. फेब्रुवारीपासून आतापर्यंत तेरा ई-लिलाव झाले असून अलीकडच्या लिलावात २ लाख टन खनिज विकले गेले आहे. सेसा वेदांताने खनिज निर्यात सुरू केली असून वेदांता आणि फोमेन्तो
रिसोर्सिस दोन्ही कंपन्या येत्या महिन्यात दोन लाख टन खनिजाची निर्यात करणार आहे. (प्रतिनिधी)