शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील खाण अवलंबितांकडून पंतप्रधानांना लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 11:59 IST

गोव्याचा खनिज खाण उद्योग सुरू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतीही पाऊले उचलत नाहीत अशी गोव्यातील हजारो खनिज खाण अवलंबितांची भावना बनली आहे. यामुळे खाण अवलंबित आणि त्यांचे नेते केंद्र सरकारविरुद्ध सक्रिय झाले आहेत.

ठळक मुद्देगोव्याचा खनिज खाण उद्योग सुरू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतीही पाऊले उचलत नाहीत अशी गोव्यातील हजारो खनिज खाण अवलंबितांची भावना बनली आहे. पंतप्रधान मोदी हे येत्या महिन्यात गोव्यातील तिसऱ्या मांडवी पुलाचे उद्घाटन करण्यासाठी गोव्यात येण्याची शक्यता आहे.पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवायचा असे खाण अवलंबितांनी ठरविले आहे.

पणजी : गोव्याचा खनिज खाण उद्योग सुरू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतीही पाऊले उचलत नाहीत अशी गोव्यातील हजारो खनिज खाण अवलंबितांची भावना बनली आहे. यामुळे खाण अवलंबित आणि त्यांचे नेते केंद्र सरकारविरुद्ध सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान मोदी हे येत्या महिन्यात गोव्यातील तिसऱ्या मांडवी पुलाचे उद्घाटन करण्यासाठी गोव्यात येण्याची शक्यता आहे. त्यावेळी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवायचा असे खाण अवलंबितांनी ठरविले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर खनिज खाण धंदा बंद झाला. काही लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार खनिज खाण धंद्यामुळे प्राप्त होतो. शिवाय गोवा सरकारच्या तिजोरीत वार्षिक एक हजार कोटींचा महसुल जमा होतो. खाण बंदीनंतर हे सगळे बंद झाले. गोव्यातील खाण व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय खनिज खाण व विकास कायद्यात दुरुस्ती करावी अशी मागणी गोव्यातील खाण अवलंबितांनी सातत्याने केली. गोव्यातील पर्रीकर सरकारनेही तशीच भूमिका घेतली व केंद्रीय खाण मंत्रलयाला त्याविषयी पत्र लिहिले. मात्र केंद्र सरकारने या पत्राची दखल घेतलेली नाही. केंद्र सरकार कायदा दुरुस्ती आणू पाहत नाही याची कल्पना गोव्यातील खाण व्यवसायिकांना व खाण अवलंबितांना आली आहे. गेल्या पंधरवडय़ात गोव्यातील खाण अवलंबितांनी दिल्लीत जाऊन तीन दिवस धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी कुणीही केंद्रीय मंत्री आंदोलकांसमोर आला नाही. यामुळे गोव्यातील खासदारांवरही खाण अवलंबित नाराज आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला धडा शिकविण्याची भाषाही खाण अवलंबित करत आहेत.

दरम्यान, गोव्यात मांडवी नदीवर मोठा पूल साकारला आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी गोवा सरकार पंतप्रधानांना निमंत्रित करणार आहे. त्यावेळी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविले जातील, असे आंदोलकांचे नेते पुती गावकर व इतरांनी जाहीर केले आहे.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीManohar Parrikarमनोहर पर्रीकर