कावरेत बंदोबस्तात खनिज वाहतूक

By Admin | Updated: May 13, 2014 18:29 IST2014-05-13T18:18:12+5:302014-05-13T18:29:09+5:30

केपे : कावरे-पिर्ला येथून होणार्‍या खनिज वाहतुकीविरोधात लोक रस्त्यावर उतरूनसुद्धा ही वाहतूक पोलीस बंदोबस्तात चालू आहे

Mineral transportation | कावरेत बंदोबस्तात खनिज वाहतूक

कावरेत बंदोबस्तात खनिज वाहतूक

केपे : कावरे-पिर्ला येथून होणार्‍या खनिज वाहतुकीविरोधात लोक रस्त्यावर उतरूनसुद्धा ही वाहतूक पोलीस बंदोबस्तात चालू आहे. या वाहतुकीला विरोध करणार्‍या लोकांना केपे पोलिसांनी अटक केल्याने कावरे गावात तणाव निर्माण झाला होता. वाहतूक कायदेशीररीत्या चालू असल्याचे संबंधित अधिकार्‍याकडून सांगितले जात आहे, तर विरोधकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे ही वाहतूक सुरू असल्याचे सांगितले जात असल्याने वाहतूक वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. सोमवारी दुपारी या खाणीला भेट देऊन पाहणी केली असता गोवा आर्मड पोलीस, इगल फोर्स, तसेच पोलीस बंदोबस्तात खनिज वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. खाणीवरून येणार्‍या प्रत्येक ट्रकवर सर्व तपशील लिहिण्यात आला होता. कावरे गावातील लोकांचा विरोध मोडून ही वाहतूक सध्या सुरळीतपणे चालू असली, तरी लोक कधी रस्त्यावर उतरतील, याचा नेम नसल्याने पोलीस बंदोबस्तातच वाहतूक होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mineral transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.