खाणप्रश्नी आता शुक्रवारी सुनावणी
By Admin | Updated: October 31, 2015 02:21 IST2015-10-31T02:18:55+5:302015-10-31T02:21:33+5:30
पणजी : गोव्यातील खनिज खाणींच्या लिज नूतनीकरणप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही.

खाणप्रश्नी आता शुक्रवारी सुनावणी
पणजी : गोव्यातील खनिज खाणींच्या लिज नूतनीकरणप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. आता येत्या शुक्रवारी नव्या न्यायाधीशांसमोर सुनावणी होणार आहे. सरकारकडून राज्यातील ८८ खनिज लिजांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यास गोवा फाउंडेशन संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांचीही खाणप्रश्नी एक याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. एकूण तीन-चार याचिका न्यायालयासमोर असून या आपल्यासमोर नव्हे, तर दुसऱ्या न्यायाधीशांसमोर सुनावणीस घेतल्या जाव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सांगितले. त्यामुळे येत्या शुक्रवारी या चारही याचिकांवर सुनावणी होणार आहे. (खास प्रतिनिधी)