मुक्त होताच मिकीच्या डरकाळ्या
By Admin | Updated: October 11, 2015 01:29 IST2015-10-11T01:29:46+5:302015-10-11T01:29:56+5:30
पणजी/मडगाव : वीज खात्याचे अभियंता कपिल नाटेकर यांना मारहाण केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेले नुवेचे आमदार मिकी पाशेको यांची शनिवारी तुरुंगातून सुटका झाली

मुक्त होताच मिकीच्या डरकाळ्या
पणजी/मडगाव : वीज खात्याचे अभियंता कपिल नाटेकर यांना मारहाण केल्याबद्दल शिक्षा भोगत असलेले नुवेचे आमदार मिकी पाशेको यांची शनिवारी तुरुंगातून सुटका झाली. शिक्षेचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पंचेचाळीस दिवस अगोदर पाशेको यांना मुक्त केले. दरम्यान, पाशेको यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, खासदार नरेंद्र सावईकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान केले. ते म्हणाले, परिवर्तनानंतर काहीजण खासदार झाले तर काही केंद्रात मंत्री झाले. मात्र, त्याचा फायदा गोमंतकीयांना मिळाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांंनी टीका केली.
न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर मिकी पाशेको गायब झाले होते. सर्वोच्च न्यायालयानेही शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतरदेखील पाशेको पोलिसांच्या हाती लागत नव्हते. २ जून रोजी ते पोलिसांना शरण आले. तेव्हापासून ते सडा येथील तुरुंगात होते. पाशेको तुरुंगात गेल्यानंतर दोन महिन्यांतच त्यांची सुटका केली जावी म्हणून राज्यपालांना माफी याचिका सादर केली होती. सरकारनेही पाशेको यांची सुटका करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मध्यंतरी विधानसभा अधिवेशन सुरू असताना पाशेको यांना अधिवेशनात सहभागी होता यावे, अशी भूमिका सरकारने घेतली होती. पाशेको यांना शिक्षा माफ करावी म्हणून राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे पार्सेकर मंत्रिमंडळाने शिफारसही केली होती. राज्यपालांनी मात्र ती शिफारस मान्य केली नव्हती. (पान ७ वर)