मिकी पाशेको जाणार गजांआड
By Admin | Updated: March 31, 2015 02:02 IST2015-03-31T01:53:36+5:302015-03-31T02:02:45+5:30
मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेले ग्रामीण विकासमंत्री मिकी पाशेको यांच्या सहा महिन्यांच्या

मिकी पाशेको जाणार गजांआड
मडगाव : वीज अभियंता कपिल नाटेकर मारहाण प्रकरणात दोषी ठरलेले ग्रामीण विकासमंत्री मिकी पाशेको यांच्या सहा महिन्यांच्या कैदेच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने जी मोहर उठविली होती, त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला पाशेको यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला व न्या. शिवा कीर्ती सिंग यांनी हा आव्हान अर्ज फेटाळून लावताना पाशेको यांना शिक्षा भोगण्याचा आदेश दिला. यासंबंधी पाशेको यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन केला; मात्र त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
या निर्णयाने पाशेको यांच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा एकदा सुरुंग लागला आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्याने पुढचे पावणेसहा महिने त्यांना तुरुंगात काढावे लागतील. यासाठी एका आठवड्यात त्यांना तुरुंगाधिकाऱ्यांसमोर शरण यावे लागेल किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर पुनर्विचार याचिका दाखल करावी लागणार आहे. अशी याचिका दाखल केल्यास ज्या न्यायाधीशांनी हा निवाडा दिला आहे, त्यांच्यासमोरच ही याचिका परत येणार असल्याने पाशेकोंसाठी ही परिस्थिती अडचणीचीच ठरणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सोमवारी दुपारी या आव्हान अर्जावरील सुनावणी न्या. कलिफुल्ला व न्या. सिंग यांनी केवळ २५ मिनिटांत निकाली काढली. पाशेको यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील गुरुमूर्ती यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापूर्वी तीन न्यायालयांनी पाशेको यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्याने या आव्हान अर्जात ठोस मुद्दा नाही, असा निष्कर्ष न्यायपीठाने काढून हा अर्ज निकाली काढला.
पाशेको हे २00६ साली प्रतापसिंह राणे यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री असताना त्यांच्याकडून हा प्रमाद घडला होता. माजोर्डा भागात वारंवार वीज खंडित होते, अशी तक्रार आल्याने त्या वेळी वेर्णा वीज केंद्रात कनिष्ठ अभियंते (पान ८ वर)