माध्यान्ह आहारात पाल; २२ विद्यार्थ्यांना बाधा

By Admin | Updated: July 1, 2015 00:53 IST2015-07-01T00:52:50+5:302015-07-01T00:53:05+5:30

कुंभारजुवे : भोम येथील महानंदू नाईक मेमोरियल हायस्कूलमध्ये पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारात मेलेली पाल सापडल्याने २२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.

Midday diet; 22 students interrupted | माध्यान्ह आहारात पाल; २२ विद्यार्थ्यांना बाधा

माध्यान्ह आहारात पाल; २२ विद्यार्थ्यांना बाधा

कुंभारजुवे : भोम येथील महानंदू नाईक मेमोरियल हायस्कूलमध्ये पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारात मेलेली पाल सापडल्याने २२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यातील ४ विद्यार्थ्यांना बेतकी येथील आरोग्य केंद्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले असून १८ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.
मंगळवार, दि. ३० रोजी मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारातील भाजीमध्ये पाल सापडल्याने भाजी खाल्लेल्या विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या. तत्काळ त्यांना हायस्कूलच्या बालरथातून शिक्षक अरुण भोसले व शिक्षिका मेघा देसाई यांनी बेतकी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. यात सातवी व आठवीत शिकणाऱ्या १८ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनींचा समावेश होता. आरोग्य केंद्रात डॉ. उगम तारी यांनी त्यांच्यावर त्वरित उपचार केले.
मुख्याध्यापक दामोदर फडते, पालक-शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास नाईक, फोंडा भाग शिक्षणाधिकारी पुष्पा बोरकर, भोमचे माजी सरपंच सुनील जल्मी, पंच दामोदर नाईक यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
मडकई येथील महिला एकता स्वयंसाहाय्य गटातर्फे २००६ पासून हायस्कूलला माध्यान्ह आहाराचा पुरवठा केला जातो; पण अशी घटना कधी घडली नव्हती, असे गटाच्या प्रमुख हर्षाली काळे यांनी सांगितले. शिक्षण खाते, पालक-शिक्षक संघटना व शिक्षकांनी याकडे अधिक लक्ष देऊन असा प्रकार पुन्हा घडू नये, याची खबरदारी घ्यावी, असे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Midday diet; 22 students interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.