दादरहून घरातून पळालेला मतीमंद मुलगा गोव्यात मडगावात सापडला; अपना घरात रवानगी
By सूरज.नाईकपवार | Updated: October 12, 2023 17:56 IST2023-10-12T17:56:15+5:302023-10-12T17:56:40+5:30
एकंदर स्थिती गस्तीवरील पोलिसांनी हेरली. काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय पोलिसांना आला.

दादरहून घरातून पळालेला मतीमंद मुलगा गोव्यात मडगावात सापडला; अपना घरात रवानगी
मडगाव: मुंबईच्या दादर भागातून घरातून पळून रेल्वेतून गोव्यात आलेला एक अल्पवयीन मुलगा मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात सापडला. तो पंधरा वर्षीय असून, मंंद बुध्दीचा आहे. भावाशी भांडण झाल्याने आपण घरातून निघून आलो असे तो पाेलिसांना सांगतो. आपले नाव मॅक्स असल्याचेही तो सांगत आहे.
पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे याबाबत संपर्क साधला आहे. सदया या मुलाला अपना घरात ठेवल्याची माहिती काेकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी तो मुंबईहून गोव्याकडे निघणाऱ्या रेल्वेमध्ये चढला होता. मडगावात पोहचल्यानंतर तो रेल्वेतून खाली उतरला व स्थानकावरच फिरु लागला. त्याची एकंदर स्थिती गस्तीवरील पोलिसांनी हेरली. काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन चौकशी केली असता, तो मंद बुध्दीचा असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या नावावरुन तो ख्रिस्ती धर्मिय असल्याचे वाटत असल्याने पोलिसांनी ख्रिस्ती धर्मगुरु व अन्य धार्मिक संस्थेशीही संपर्क साधला. सदया पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.