गोव्यातील माेबाेर किनाऱ्यावर उत्तराखंडचा इसम मृतावस्थेत सापडला, समुद्रात उडी मारून जीवन संपवल्याचा संशय
By सूरज.नाईकपवार | Updated: March 7, 2024 19:31 IST2024-03-07T19:30:47+5:302024-03-07T19:31:24+5:30
Goa News: गोव्यातील सासष्टीतील माेबोर समुद्रकिनाऱ्यावर उत्तराखंड राज्यातील एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह आज गुरुवारी सापडला,राजेश मामगेन असे मयताचे नाव आहे, त्याने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोव्यातील माेबाेर किनाऱ्यावर उत्तराखंडचा इसम मृतावस्थेत सापडला, समुद्रात उडी मारून जीवन संपवल्याचा संशय
- सूरज नाईकपवार
मडगाव - गोव्यातील सासष्टीतील माेबोर समुद्रकिनाऱ्यावर उत्तराखंड राज्यातील एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह आज गुरुवारी सापडला,राजेश मामगेन असे मयताचे नाव आहे, त्याने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवचिकित्सेंनतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.मयताकडे एक बॅग सापडली आहे.
बॅगेत असलेल्या कागदपत्रकातून त्याची ओळख पटली. २९ फेब्रुवारीला तो गोव्यात आला होता,बेरोजगार असल्याने नैराश्येतून त्याने आपले जीवन संपविले असावे अशीही शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. मयताच्या कुटुंबियांकडे संपर्क साधला आहे. ती मंडळी गोव्यात आल्यानंतर नेमकी बाब स्पष्ट होणार आहे. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई पुढील तपास करीत आहेत.