शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांविषयींच्या आठवणींना पणजीच्या निवडणुकीत उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 12:17 IST

माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. गेली पंचवीस वर्षे पर्रीकर यांच्या हयातीतच पणजीत सगळ्या निवडणुका झाल्या, ज्या भाजपाने अखंडीतपणे जिंकल्या.

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे.गेली पंचवीस वर्षे पर्रीकर यांच्या हयातीतच पणजीत सगळ्या निवडणुका झाल्या, ज्या भाजपाने अखंडीतपणे जिंकल्या. प्रथमच पर्रीकर नाहीत पण पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणींना सर्वबाजूने यावेळच्या निवडणुकीत उजाळा दिला जात आहे.

पणजी - माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. गेली पंचवीस वर्षे पर्रीकर यांच्या हयातीतच पणजीत सगळ्या निवडणुका झाल्या, ज्या भाजपाने अखंडीतपणे जिंकल्या. यावेळी प्रथमच पर्रीकर नाहीत पण पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणींना सर्वबाजूने यावेळच्या निवडणुकीत उजाळा दिला जात आहे. केवळ भाजपाचेच उमेदवार नव्हे तर विरोधात असलेले उमेदवारही विविध अर्थानी पर्रीकरांविषयीच्या आठवणी जाग्या करू लागले आहेत.

1994 सालापासून पर्रीकर कायम पणजीत जिंकले व त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. पर्रीकर यांनी पणजीत काँग्रेसच्या उमेदवाराला 1989 सालानंतर कधीच जिंकू दिले नाही. पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यानंतर 2015 साली व 2017 सालीही पणजीत भाजपाचाच विजय झाला. काँग्रेसने तीस वर्षे पणजीत विजय अनुभवलेला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पर्रीकर यांच्या निधनानंतरच्या पहिल्या निवडणुकीत पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात हे दोघेही सक्रिय झाले आहेत. भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांच्यासाठी उत्पल व अभिजात प्रचार काम करत आहेत. कुंकळ्ळ्य़ेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रथम पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की पणजीत पर्रीकर यांनी जलदगतीने विकास केला. त्यामुळे पणजीचे लोक विकासासाठी यावेळीही मत देतील. पर्रीकर यांच्यावर पणजीतील लोकांनी खूप प्रेम केले. त्या प्रेमापोटीही लोक यावेळी मतदान करतील. पर्रीकर यांच्याच मार्गदर्शनाखाली व तालमीत पणजीत भाजपा कार्यकर्त्यांची टीम तयार झाली. दरम्यान, भाजपाविरुद्ध लढणारे प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले की, पर्रीकर यांच्याविषयी पणजीवासियांना आदर आहे. ते मोठेच नेते होते पण पणजीत आता सहानुभूती नाही व त्यामुळे भाजपाला पर्रीकर यांच्याविषयीच्या कोणत्याच सहानुभूतीचा लाभ निवडणुकीत मिळणार नाही.

पर्रीकरपुत्रही मनाचा दिलदार, 'पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठीच काम करणार'

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पणजी मतदारसंघात भाजपाने उमेदवारी नाकारलेले पर्रीकरपुत्र उत्पल यांनी पक्षाचा निर्णय आपल्याला शिरसावंद्य असल्याचे म्हटले. तसेच, राजकारणात अडथळे पार करुन पुढे जायचे असते, तेच मी करणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी मी काम करीन, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या या मतदारसंघात त्यांचे पुत्र उत्पल हेही तिकिटासाठी शर्यतीत होते. परंतु, भाजपाने त्यांना डावलून माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांना तिकीट दिले. त्या पार्श्वभूमीवर उत्पल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘पक्षाने माझ्या उमेदवारीबाबत ठरविले तर मी आहे, असे मी म्हटले होते. राजकारण स्वच्छ करण्यासाठी येण्याची इच्छा होती. पर्रीकर यांनीही नेहमी हीच इच्छा बाळगली आणि त्यांनाही सुरुवातीला बरेच अडथळे आले. राजकारणात अडथळे पार करुन पुढे जायचे असते, तेच मी करणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आणि प्रचारातही सहभागी होणार.’ 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपाgoaगोवा