मराठी राजभाषेसाठी पणजीत आज मेळावा
By Admin | Updated: January 10, 2016 01:43 IST2016-01-10T01:41:49+5:302016-01-10T01:43:08+5:30
पणजी : मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून गो. रा. ढवळीकर व इतरांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या

मराठी राजभाषेसाठी पणजीत आज मेळावा
पणजी : मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून गो. रा. ढवळीकर व इतरांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रविवारी दुुपारी ३ वाजता येथील आझाद मैदानावर मराठीप्रेमींचा मेळावा होणार आहे.
विधानसभा अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर मराठीप्रेमी शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ‘मगो’चे मंत्री सुदिन ढवळीकर तसेच भाजपचे आमदार विष्णू वाघ व डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ हे या मेळाव्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांनी मेळाव्याच्या आयोजकांना तशी ग्वाही दिली आहे. कोकणीला राजभाषेचे स्थान आहेच. मराठीलाही तेच स्थान दिले जावे व त्यासाठी गोवा राजभाषा कायद्यात दुरुस्ती केली जावी, अशी गो. रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील संघटनेची मागणी आहे. संघटनेने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह अनेक मंत्री व आमदारांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले आहे.
दरम्यान, कोकणी भाषा मंडळानेही अनेक आमदारांना भेटून मराठीला राजभाषेचे स्थान दिले जाऊ नये, अशी मागणी केली आहे. भाषावाद १९८६ सालीच संपला, असे भाषा मंडळाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)