माध्यमप्रश्नी राज्यभर आंदोलन

By Admin | Updated: December 20, 2015 02:32 IST2015-12-20T02:31:45+5:302015-12-20T02:32:12+5:30

पणजी : इंग्रजी माध्यमिक शाळांना दिले गेलेले सरकारी अनुदान मागे घेण्यात यावे, यासाठी भाषा सुरक्षा मंचने मुक्तिदिनी

Media Question: Movement throughout the state | माध्यमप्रश्नी राज्यभर आंदोलन

माध्यमप्रश्नी राज्यभर आंदोलन

पणजी : इंग्रजी माध्यमिक शाळांना दिले गेलेले सरकारी अनुदान मागे घेण्यात यावे, यासाठी भाषा सुरक्षा मंचने मुक्तिदिनी राज्यव्यापी निदर्शने करून सरकारविरुद्ध आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
राज्यभरात १९ ठिकाणी धरणे धरण्यात आली. पुढील टप्प्यात राज्यभर मेळावे आयोजिले आहेत. पणजीत बस स्टॅँडवर सकाळी ९ ते दु. १२.३० या वेळेत निदर्शने करण्यात आली. या कार्यक्रमाला रत्नाकर लेले, अरविंद भाटीकर, विलास सतरकर आणि इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. म्हापसा, डिचोली, साखळी, वाळपई, पेडणे, फोंडा, मुरगाव, मडगाव, केपे, सांगे, काणकोण आणि इतर भागांतही निदर्शने करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Media Question: Movement throughout the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.