शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुरगाव तालुक्यात पावसाळ्यापूर्वी डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 5:36 PM

वास्को: पावसाळ्यात डेंग्यूचा धोका लक्षात घेऊन आरोग्य खात्याने त्वरित उपाययोजना सुरु करणे गरजेचे आहे. २०१९ मध्ये दक्षिण गोव्यातील मुरगाव ...

वास्को: पावसाळ्यात डेंग्यूचा धोका लक्षात घेऊन आरोग्य खात्याने त्वरित उपाययोजना सुरु करणे गरजेचे आहे. २०१९ मध्ये दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील विविध भागात ११३४ हून जास्त डेंग्यू सदृश्य ताप आलेल्या रुग्णांवर इस्पितळात उपचार करण्यात आलेले  होते. त्यातील चार जणांचे डेंग्यूसदृश्य तापावर उपचार घेताना निधन झाले. यात तीन पुरूष तर एका महिलेचा समावेश होता.

पावसाळा सुरू होण्यास अवघा एक महिना राहिला आहे. २०१९ वर्षांच्या सुरुवातीपासून डिसेंबरपर्यंत मुरगाव तालुक्यातील चिखली, दाबोळी येथे असलेल्या उपजिल्हा इस्पितळातच विविध भागात (वास्को, बायणा, नवेवाडे, वाडे, सडा इत्यादी) राहणा-या ११३४ डेंग्यू सदृश्य ताप आलेल्या रुग्णावर उपचार करण्यात आले होते. या व्यतिरिक्त मुरगाव तालुक्यातील विविध भागात असलेल्या खासगी इस्पितळातही अनेक डेंग्यू सदृश्य ताप आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आला होता. २०१९ सालात डेंग्यूवर आळा घालण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या डॉक्टर तसेच अधिका-यांकडून विविध प्रकारची पाऊले उचलण्यात येत असल्याचे दिसून आले, मात्र याचा जास्त फायदा झाला नसल्याचे तेव्हा दिसून आले होते. 

गेल्या वर्षी डेंग्यूमुळे ज्या प्रकारे मुरगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. ती परिस्थिती यावर्षी होऊ नये, यासाठी आरोग्य खात्याने तसेच संबंधितांनी आतापासूनच पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. २०२० च्या सुरुवातीपासून आतापर्यंत चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात डेंग्यू सदृष्य ताप आलेले काही रुग्ण उपचारासाठी आले होते, असे या इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले. डेंग्यूवर आळा घालण्यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्राबरोबरच मुरगाव नगरपालिकेने तसेच इतर संबंधितांनी यासाठी पावले उचलण्यास सुरवात करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. 

लॉकडाऊननंतर कार्यवाहीपावसाळ्यात मुरगाव तालुक्यात डेंग्यूचा फैलाव होऊ नये, यासाठी सध्या वास्को शहरी आरोग्य विभाग विविध पाऊले उचलत असली तरी लॉकडाऊनमुळे काही मर्यादा येतात. ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर वास्को शहरी आरोग्य केंद्राचे अधिकारी - कर्मचारी विविध भागातील नागरिकांच्या घराच्या परिसरात जाऊन तपासणी करण्यास सुरवात करील. अनेक नागरिक बॅरलात, भांड्यात पाणी भरून उघडे ठेवत असून यात डेंग्यू पसरवणा-या डासांची पैदास होते.

लॉकडाऊन संपल्यानंतर करण्यात येणा-या तपासणीत अशा प्रकारे डेंग्यू पसरवणा-या डासांची पैदास होत असल्याचे दिसून आल्यास सुरक्षेच्या दृष्टीने काम करण्यात येणार असल्याची माहिती वास्को शहरी आरोग्य केंद्राची प्रमुख डॉ. रश्मी खांडेपारकर यांनी दिली. पावसाळ्यात डेंग्यूचे प्रमाण वाढत असून त्याच्यावर आळा घालण्यासाठी आम्हाला ३ मे नंतर सुमारे एक महिन्याचा काळ मिळणार असून आमच्या हद्दीतील भागात जास्तीत जास्त प्रमाणात डेंग्यूवर आळा घालण्यासाठी उचित पावले उचलली जाणार असे डॉ. खांडेपारकर यांनी पुढे सांगितले. 

टॅग्स :goaगोवा