शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात इंग्रजीसह सर्व शाळांविषयी मागितले शक्याशक्यता अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:07 IST

गोवा सरकारच्या शिक्षण खात्याकडे अजूनही नव्या शाळा आणि नवी हायस्कुल सुरू करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे अर्ज येणे सुरूच आहे.

पणजी : गोवा सरकारच्या शिक्षण खात्याकडे अजूनही नव्या शाळा आणि नवी हायस्कुल सुरू करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे अर्ज येणे सुरूच आहे. इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठीही अर्ज सादर झाले आहेत. इंग्रजीसह विविध माध्यमातील शाळा ज्या भागात सुरू करण्याची शैक्षणिक संस्थांची इच्छा आहे, त्या भागाला भेट देऊन शक्याशक्यता अहवाल सादर करण्यास शिक्षण खात्याने भागशिक्षणाधिकारी व अन्य अधिका:यांना सांगितले आहे.

नव्या कोणत्या शाळांना परवानगी द्यावी याविषयी सरकार येत्या महिन्यात निर्णय घेणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत आहे. पूर्वी वीसपेक्षा जास्त शाळा सुरू करण्यासाठी अर्ज  आले होते. आता आणखी चार नव्या शाळांसाठी अर्ज सादर झाले आहेत. पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी म्हणजे हायस्कूलसाठी नऊपेक्षा जास्त अर्ज सादर झाले आहेत. मराठी, कोंकणी शाळा सुरू करण्यासाठी जास्त अर्ज आले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठीही अर्ज सादर झाले आहेत.

शिक्षण खात्याने किंवा सरकारने अजून इंग्रजीसाठी आलेले अर्ज फेटाळलेले नाहीत. सरकार इंग्रजी शाळांविषयीही येत्या महिन्यातच निर्णय घेणार आहे. तत्पूर्वी कोणत्या भागात किती अंतरावर सरकारी शाळा किंवा अनुदानित शाळा सध्या चालतात व नवी शाळा सुरू करायला मान्यता दिल्यास बाजूच्या शाळेवर काही परिणाम होणार की काय याविषयीची माहिती प्राप्त करून शक्याशक्यता अहवाल सादर करण्याची जबाबदारी अधिका-यांवर आहे. यापूर्वी अनेक सरकारी शाळा बंद पडल्या आहेत किंवा बाजूच्या शाळेत त्यांचे विलिनीकरण झालेले आहे. काही हायस्कूले प्राथमिक वर्ग सुरू करू पाहत आहेत.

कोंकणी, मराठीसह देशी भाषांतील प्राथमिक शाळांनाच अनुदान द्यावे असे सरकारी धोरण आहे. गेल्यावर्षी एकाही शाळेला सरकारने मान्यता दिली नव्हती. इंग्रजी शाळांचे अर्ज फेटाळतानाच मराठी व कोंकणीतून शाळा सुरू करण्यासाठी आलेले अजर्ही फेटाळले गेले होते. यावेळी सरकार कोणती भूमिका घेते ते पहावे लागेल, अशी चर्चा देशी भाषाप्रेमींमध्ये सुरू आहे.

राज्यात सध्या सुमारे आठशे मराठी माध्यमाच्या सरकारी शाळा चालतात. त्या शिवाय अनुदानित व खासगी शाळा चालतात. काही सरकारी हायस्कूले व अनेक अनुदानित हायस्कूल चालतात. त्यात एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत.

टॅग्स :Schoolशाळा