मराठी चित्रपट महोत्सव ६ जूनपासून
By Admin | Updated: May 12, 2014 01:28 IST2014-05-12T01:27:50+5:302014-05-12T01:28:05+5:30
मराठी चित्रपट महोत्सव ६ जूनपासून

मराठी चित्रपट महोत्सव ६ जूनपासून
पणजी : व्हीनसन वर्ल्ड आयोजित सातवा गोवा मराठी चित्रपट महोत्सव दि. ६ जूनपासून सुरू होणार आहे. तीन दिवस चालणार्या या महोत्सवात दर्जेदार नवीन चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सिने तारे-तारकांच्या उपस्थितीत हा महोत्सव साजरा होणार आहे, अशी माहिती व्हीनसन वर्ल्डचे अध्यक्ष संजय शेट्ये यांनी दिली. दि. ६ ते ८ रोजीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. गोमंतकीयांचा गेल्या वर्षीचा उदंड प्रतिसाद पाहता आमची जबाबदारी वाढली असून हा महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरविले असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. चालू वर्षातील प्रदर्शित झालेले नवीन चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. तसेच काही चित्रपटांचे प्रीमियर शोही होणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. महोत्सवासंदर्भात प्राथमिक बैठका झाल्या असून सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. सिने तारे-तारकांशी प्राथमिक बोलणी झाली आहे. निश्चिती कळल्यानंतरच कोण कोण पाहुणे येणार हे जाहीर करण्यात येणार आहे. गोमंतकीयांनी दरवर्षी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यानुसारच यंदा प्रतिसाद दिला आहे. म्हणूनच यंदाच्या महोत्सवाचे आयोजन ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार असल्याचे पुढे सांगितले.