म्हापसा, ताळगावचे ‘ओडीपी’ १0 पूर्वी!

By Admin | Updated: December 24, 2015 01:50 IST2015-12-24T01:50:16+5:302015-12-24T01:50:30+5:30

पणजी : म्हापसा व ताळगावचे बाह्यविकास आराखडे (ओडीपी) येत्या दि. १० जानेवारीपूर्वी तयार करून मान्यतेसाठी

Mapusa, TDP's 'ODP' 10 ago! | म्हापसा, ताळगावचे ‘ओडीपी’ १0 पूर्वी!

म्हापसा, ताळगावचे ‘ओडीपी’ १0 पूर्वी!

पणजी : म्हापसा व ताळगावचे बाह्यविकास आराखडे (ओडीपी) येत्या दि. १० जानेवारीपूर्वी तयार करून मान्यतेसाठी सरकारकडे पाठविले जातील, असे गोवा
नगर विकास प्राधिकरणाचे (एनजीपीडीए) चेअरमन आमदार मायकल लोबो यांनी बुधवारी येथे सांगितले.
२० डिसेंबरपर्यंत दोन्ही ओडीपींना अंतिम रूप दिले जाईल, असे गेल्या महिन्यात लोबो यांनी जाहीर केले होते. त्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, ‘ओडीपीं’बाबतचे थोडे काम शिल्लक राहिले आहे. म्हापशातील शेतकऱ्यांसाठी येत्या २९ व ३० रोजी सुनावणी घेतली जाईल. ताळगाव ‘ओडीपी’बाबतही काही सूचना विचारात घेऊन थोड्या दुरुस्त्या केल्या जातील.
दरम्यान, ओडीपींसाठी यापूर्वी एनजीपीडीएने नेमलेल्या समितीवरील काही आमदार व अन्य सदस्य बैठकीच्या इतिवृत्तांतावर सही करण्यास तयार नसल्याविषयी आमदार लोबो यांना या प्रतिनिधीने विचारले असता, ओडीपी तयार होतील, तेव्हा सर्वांना सही करावी लागेल, असे ते म्हणाले. अजून ओडीपी तयार झालेले नसल्याने आता सही करण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावाही लोबो यांनी केला.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Mapusa, TDP's 'ODP' 10 ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.