मनोहर पर्रीकरांचं संरक्षण मंत्रिपद कायम राहणार
By Admin | Updated: June 16, 2016 21:52 IST2016-06-16T21:52:33+5:302016-06-16T21:52:33+5:30
मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षण मंत्रालय कायम ठेवले जाणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे.

मनोहर पर्रीकरांचं संरक्षण मंत्रिपद कायम राहणार
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - केंद्रीय मंत्रिमंडळाची लवकरच फेररचना होणार आहे. मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षण मंत्रालय कायम ठेवले जाणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे. यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीवेळी ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुन्हा गोव्याच्या राजकारणात परतण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
अर्थ, विदेश व्यवहार, गृह या मंत्रालयांचेही मंत्री बदलले जाणार नाहीत, अशी माहिती भाजपच्या दिल्लीतील सूत्रांनी दिली आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याच नेतृत्वाखाली होतील. पर्रीकर केवळ प्रचार करतील, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे.