शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

...अन् 'त्या' एका निर्णयानं पर्रीकरांनी देशाचे 49,300 कोटी रुपये वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 09:37 IST

संरक्षण मंत्री असताना पर्रीकरांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

नवी दिल्ली/पणजी: मनोहर पर्रीकरांच्या निधनामुळे एक सच्चा, नम्र आणि प्रामाणिक राजकारणी हरपल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे. साधेपणा कायम जपणाऱ्या आणि भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या पर्रीकरांच्या निधनामुळे सारा देश हळहळतो आहे. पर्रीकर यांनी देशाचे संरक्षणमंत्रीपद भूषवताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र इतक्या महत्त्वाच्या पदावर असतानाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा, घोटाळ्याचा आरोप झाला नाही. किंबहुना पर्रीकर यांच्या याच गुण वैशिष्ट्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याकडे या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी दिली होती. काही दिवसांपूर्वीच एस-400 च्या खरेदीचं सर्वत्र कौतुक सुरू होतं. कारण एस-400 मिसाईल शिल्डमुळे शत्रूनं केलेला हल्ला हवेतल्या हवेतच हाणून पाडणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारतानं रशियाकडून अशा प्रकारच्या 5 सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना पर्रीकरांनी देशाच्या जनतेचे तब्बल 49,300 कोटी रुपये वाचवले. एस400 च्या खरेदीची, त्यामुळे वाढणाऱ्या भारताच्या सामर्थ्याची भरपूर चर्चा झाली. मात्र हा संपूर्ण करार करताना पर्रीकरांनी जो व्यवहारीपणा दाखवला, त्याची फारशी चर्चा झाली नाही. हवाई हल्ल्याची रणनिती आखताना मुख्यत्वे तीन पल्ल्यांचा विचार होता. दीर्घ, मध्यम आणि लहान टप्प्यानुसार रणनिती आखली जाते. यातील एस-400 सिस्टम दीर्घ पल्ल्यातील यंत्रणा आहे. शत्रूनं डागलेली क्षेपणास्त्रं 380 किलोमीटरवर नष्ट करण्याची क्षमता एस-400 मध्ये आहे. यामुळे शत्रूचा हल्ला खूप आधीच हवेतल्या हवेत परतून लावणं शक्य होणार आहे. संरक्षण क्षेत्रासाठी इतका मोठा निर्णय घेताना पर्रीकरांनी पुढील काळात देशाकडून होणाऱ्या संरक्षण खरेदी साहित्याच्या योजनेचा पुनर्विचार केला. हवाई दलानं 2027 पर्यंत विविध टप्प्यातील संरक्षण प्रणालींची आखणी केली होती. मात्र एस-400 खरेदीच्या निर्णयामुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या प्रणालींची कितपत आवश्यकता भासणार, हा प्रश्न निर्माण झाला. यानंतर हवाई दलाकडून तांत्रिक अभ्यास करण्यात आला. एस-400 च्या खरेदीमुळे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण प्रणालींची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं यातून समोर आलं. यासाठी पर्रीकरांनी संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर अनावश्यक असलेल्या लहान आणि मध्यम पल्ल्याच्या संरक्षण प्रणालींची खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्रीकरांच्या या निर्णयानं देशाचे 49,300 कोटी रुपये वाचले.  

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरDefenceसंरक्षण विभागindian air forceभारतीय हवाई दल