मनोहर पर्रिकर भ्रष्टाचारी मंत्र्यांचे नेते - संजय राऊत
By Admin | Updated: January 31, 2017 19:26 IST2017-01-31T19:23:10+5:302017-01-31T19:26:15+5:30
शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलेले असताना गोव्यामध्येही शिवसेनेने भाजपा विरोधात आघाडी उघडली आहे.

मनोहर पर्रिकर भ्रष्टाचारी मंत्र्यांचे नेते - संजय राऊत
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 31 - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलेले असताना गोव्यामध्येही शिवसेनेने भाजपा विरोधात आघाडी उघडली आहे. गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेने थेट संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांना लक्ष्य केले आहे. गोवा सरकारमधील भाजपाचे सर्व मंत्री भ्रष्टाचारी आहेत आणि मनोहर पर्रिकर त्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे नेते आहेत अशी टीका शिवसेनेचे नेते मनोहर पर्रिकर यांनी केली.
All BJP Ministers in Goa Govt are corrupt and Manohar Parrikar is the leader of all these corrupt leaders: Sanjay Raut, Shiv Sena
— ANI (@ANI_news) 31 January 2017