शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मनोहर पर्रीकर आणि २0१२ ची क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 00:48 IST

आयआयटीयन मनोहर पर्रीकर यांनी आपल्या बुद्धिकौशल्याचा उपयोग विकासाद्वारे लोककल्याणासाठी करताना निष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी व निष्कलंक चारित्र्य याचा आदर्श निर्माण केला आहे. पर्रीकरांमुळे आयआयटीमध्ये मिळणाऱ्या प्रगत व प्रगल्भ ज्ञानाला सामाजिक आशय प्राप्त झाला आहे. यातून अधिकाधिक आयआयटीयन्सना राजकारणात येण्याची प्रेरणा मिळू शकते.

- सीताराम टेंगसे  ( मनोहर पर्रीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त लोकमतने हा लेख प्रसिद्ध केला. आज पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही पुनर्प्रकाशित करत आहोत. )२0१४ च्या लोकसभा निवडणुकांत संपूर्ण देशात जशी क्रांती घडून आली होती, तशीच व त्याच स्वरुपाची क्रांती गोव्यात २0१२ साली विधानसभा निवडणुकांमुळे घडून आली होती. या दोन्ही निवडणुकांत तोवरची सगळी राजकीय समीकरणे निकालात निघाली. या दोन्ही निवडणुकांत सर्व राजकीय पक्षांच्या पारंपरिक मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात उलथापालथ घडून आली. म्हणूनच या दोन्ही निवडणुकांनी घडवून आणलेले परिवर्तन फक्त राजकीय नव्हते, ते सामाजिक व सांस्कृतिक पण होते. दोन्ही वेळचे परिवर्तन ही मोठी क्रांती होती. २0१४ च्या क्रांतीचे शिल्पकार जसे नरेंद्र मोदी होते, तसेच गोव्यात २0१२ साली घडून आलेल्या किंवा मतदारांनी मतपेटीद्वारे घडवून आणलेल्या त्या सर्वांगीण क्रांतीचे प्रवर्तक राज्याचे माजी मुख्यमंत्री व आजचे देशाचे कर्तबगार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर होते. या क्रांतीमुळे गोव्याचे राजकारण तत्त्वनिष्ठ व लोकाभिमुख बनले. गोव्याच्या इतिहासात प्रथमच मतदार हा राजकारणाचा, सरकारी धोरणांचा, कार्यक्रमांचा केंद्रबिंदू बनला; आणि त्याहीपेक्षा या क्रांतीचा सर्वात महत्त्वाचा विशेष म्हणजे गोव्यातील मतदारांची हिंदू मतदार व ख्रिस्ती मतदार ही मुक्तीपासून रुजलेली विभागणी मोडीत निघाली आणि गोव्यातील मतदार प्रथमच संपूर्ण गोव्याचा व एकंदर गोवेकरांच्या हिताचा विचार करू लागला. भारतासारख्या धर्म, जाती-पोटजाती, पंथ, भाषा यांच्या आधारे शतखंडित झालेल्या समाजरचनेत अशी क्रांती सहसा घडून येत नाही. तिची सुरुवात गोव्यात हिन्दू - ख्रिस्ती धर्मांचे अनुयायी मागचे सगळे विसरून भारतीय जनता पार्टीसारख्या, धर्मांध व जातीयवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षाच्या बाजूने एकत्र येण्यात झाली. संपूर्ण देशात तो चमत्कार प्रथम गोव्यात घडून आला आणि तो घडवून आणला मनोहर पर्रीकर यांनी.भाजपानेच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पर्रीकरांव्यतिरिक्त दुसरा कोणी उभा केला असता तर असे काही घडून आले नसते असे मला तरी ठामपणे वाटते. फक्त भारतीय जनता पार्टीलाच नव्हे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पण अन्य धर्मीयांमध्ये स्वीकारार्ह बनविण्याचे काम मनोहर पर्रीकर यांच्यामुळे झाले. पर्रीकरांची बुद्धिमत्ता, कल्पकता, राज्याच्या व लोकांच्या प्रश्नांची नेमकी जाण आणि त्यावर योजावयाचे उपाय, त्याच्या जोडीला प्रामाणिकपणा, सचोटी व साधेपणा यांचा बोलाबाला संपूर्ण देशात झाला होता. या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपा व रा. स्व. संघ यांच्याकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन देशभर बदलण्यास मदत झाली होती. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकांत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांमधील मतदार भाजपाकडे वळला. त्यासाठी देशातील लोकांच्या मनाची मशागत पूर्वीच झाली होती. त्यामागे पर्रीकरांच्या गोव्यातील भ्रष्टाचारमुक्त, कार्यतत्पर व लोकाभिमुख कारभाराचा देशभर पडलेला प्रभाव पण असणारच.मनोहर पर्रीकर ‘आयआयटियन’ म्हणजे ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’ या अतिबुद्धिमान मुला-मुलींसाठी असलेल्या तंत्रविज्ञान शिक्षण संस्थेचे पदवीधर. आयआयटी व आयआयटीयन्स यांचा दबदबा देशात फार पूर्वीपासून आहे. खास परीक्षेद्वारे अतिबुद्धिमान विद्यार्थी हुडकून काढून त्यांच्यासाठी पंडित नेहरुंनी जन्मास घातलेल्या या संस्था! देशातील ‘आयआयटी’मधून पदवीधर होऊन बाहेर पडलेल्यांपैकी देशाच्या विकासास हातभार लावण्यासाठी देशात किती जण राहिले आणि किती जण -विदेशाचा खास करुन अमेरिकेचा फायदा करून देऊन स्वत:चाही मोठा विकास साधण्यावर नजर ठेवून -विदेशात गेले व तेथेच स्थायिक झाले हा खास संशोधनाचा विषय ठरावा. आयआयटियनपैकी पर्रीकर वगळल्यास आणखी कोणी निवडणुकीच्या राजकारणात उतरलेला व यशस्वी झालेला नसावा. नंदन निलेकणी हे पण आयआयटी पदवीधर, ‘आधारकार्ड’ संकल्पना साकार करुन लोकांच्या कौतुकास व आदरास पात्र झालेले! पण ते काँग्रेसवर विसंबले व बिचारे फसले. कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊन स्वत:ची खास राजकीय प्रतिमा तयार केलेले सुद्धा कोणी आयआयटियन नसावेत. मात्र पर्रीकर त्याला अपवाद! ते आयआयटियन असूनही तसे असल्याचे दाखवत सुद्धा नाहीत. मात्र रा. स्व. संघाचा अर्ध्या खाकी चड्डीत शाखेत जाणारा निष्ठावंत सैनिक हे मात्र ते अभिमानाने सांगतात. त्यांना पाहिल्यानंतर व त्यांची ‘सर्वत्र समबुद्धी’ची वृत्ती पाहिल्यानंतर, अशा प्रकारचे निष्ठावंत कार्यकर्ते घडविणाºया संघाला कोण नावे ठेवणार? त्यांना स्वत:च्या बुद्धिवैभवाचा अभिमान जरुर आहे, पण त्याचा अहंकार नाही. म्हणूनच ते सक्रिय राजकारणात उतरूशकले आणि आपल्या बुद्धिकौशल्याचा उपयोग विकासाद्वारे लोककल्याणासाठी करताना निष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी व निष्कलंक चारित्र्य याचा आदर्श निर्माण करून इतरांसमोर ठेवू शकले. पर्रीकरांमुळे आयआयटी या संस्थांची प्रतिष्ठा व लौकिक वाढण्यास फार मोठी मदत झाली आहे. यातून अधिकाधिक आयआयटीयन्सना राजकारणात येण्याची प्रेरणा मिळू शकते.पर्रीकर ईश्वरावर श्रद्धा ठेवणारे आहेतच, त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचा, मग तो वैयक्तिक असो, राजकीय असो व आणखी कसला असो त्याला ते तर्कशुद्ध पद्धतीनेच भिडतात आणि त्याचे उत्तर शोधून काढतात. मुख्यमंत्री झाल्यापासूनच नव्हे, तर पूर्वी आमदार म्हणून काम करीत असतानासुद्धा त्यांच्या या गणिती बुद्धीचा पुरेपूर अनुभव आला आहे. त्यांना ‘फॅक्टस अ‍ॅण्ड फिगर्स’ यात अधिक स्वारस्य. कारण त्याशिवाय प्रश्न सर्वांगांनी समजूनच घेता येत नाही. आणि प्रश्न समजला नाही तर त्याची उकल होऊ शकत नाही. पर्रीकर मुख्यमंत्री होण्यापूर्वी गोवा व गोवेकर राजकारण्यांनी निर्माण केलेल्या भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतून पडले होते. त्यातून गोव्याला पूर्णपणे नसले तरी बºयाच मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्याचे काम पर्रीकर यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर करून दाखविले. गोव्यात भ्रष्टाचार एवढा सर्वव्यापी बनला आहे की तो पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी पर्रीकरांसारखाच कणखर, फटकळ, प्रामाणिक व क्रियाशील मुख्यमंत्री किमान दहा वर्षे तरी असावयास हवा. ई-प्रशासन ही संकल्पना प्रभावीपणे लागू केली तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी करता येणे शक्य आहे. काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीत भ्रष्टाचार व वशिलेबाजी हे परवलीचे शब्द बनले होते. पर्रीकर १९९४ मध्ये आमदार झाल्यापासून भ्रष्टाचाराविरुद्ध झगडत, आवाज उठवत राहिले आणि २0१२ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला आळा घालण्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहिले. भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला नसला तरी त्याचे मार्ग बंद झाले आहेत व एकंदरीत भ्रष्टाचार बºयाच प्रमाणात कमी झाला आहे. पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात गेल्यानंतर तो वाढत आहे असे म्हणतात. पण पर्रीकर यांनी मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचार आटोक्यात ठेवण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा व मंत्रणा योग्य प्रकारे कार्य करीत असेल तर तो तसा वाढण्याचा संभव नाही.पर्रीकर २0१२ साली मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्याची आर्थिक स्थिती बिकट होती. महसुलाचा मुख्य स्रोत असलेला खाण उद्योग बंद झाला होता. पर्रीकरांनी आपले बुद्धिकौशल्य वापरून महसुलाचे नवनवे मार्ग शोधले. त्यामुळे राज्याचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढला. दुसरा कोणी मुख्यमंत्री असता तर त्याची काय अवस्था झाली असती कल्पनाच केलेली बरी. पर्रीकरांनी उलट समाजाच्या विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात कल्याण योजना तयार केल्या व यशस्वीरीत्या राबविल्या. त्यांचा फायदा गोवेकर समाजाच्या प्रत्येक वर्गाला मिळत आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेवर, कार्यक्रमावर, उपक्रमावर पर्रीकरांचा ठसा आहे. पर्रीकरांना माणसाची पारख उत्तम असल्यामुळे आपल्याभोवती कार्यक्षम, कार्यतत्पर व प्रामाणिक अधिकाऱ्यांचा ताफा ते आपल्यासाठी तयार करु शकले. सरकार प्रमुख जेव्हा प्रामाणिक व कार्यक्षम असतो, प्रशासनाच्या प्रत्येक अंगाची अचूक जाण त्याला असते तेव्हा प्रशासनाला आपोआप गती येते, आणि त्याचा लाभ लोकांना होतो. मुक्तीनंतर प्रथमच पर्रीकरांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत प्रशासन खºया अर्थाने क्रियाशील बनले.मनोहर पर्रीकर आज वयाची ६0 वर्षे पूर्ण करीत आहेत. संरक्षणमंत्री म्हणून ते केंद्रात गेले असले तरी दिल्लीच्या दरबारी संस्कृतीत ते रुळलेले नाहीत आणि रुळणारही नाहीत. कारण तो त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांना दर शनिवारी गोव्यात परतल्याशिवाय चैन पडत नाही. संरक्षणमंत्री म्हणून फार मोठी जबाबदारी पर्रीकरांवर मोदींनी टाकली आहे. पर्रीकरच त्या खात्याला न्याय देऊ शकतील हा त्यामागचा विश्वास आहे. आणि अल्प काळात पर्रीकरांनी आपला प्रभाव दाखवला आहे. विज्ञान व तंत्रविज्ञान यातील तज्ज्ञ असलेला संरक्षणमंत्री देशाला प्रथमच लाभला आहे. पर्रीकर संरक्षण खात्याला तर न्याय देतीलच शिवाय त्यांच्यासारखा संरक्षणमंत्री असल्याने देशाच्या सेनादलांचे मनोबल व निर्धार

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा