शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

मांडवीतील मासे घातक

By admin | Updated: January 20, 2015 02:15 IST

प्रदूषण वाढल्याचा अहवाल : पाण्यात धोकादायक जंतूचे प्रमाण अधिक

पणजी : मांडवी नदीत विविध कारणास्तव ‘फेकल कॉलिफॉर्म’चे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमी अनेकदा करत असतात. या तक्रारींना बळकटी देणारा अहवाल शासकीय पातळीवर तयार झाला असून तो शासकीय यंत्रणांकडून राष्ट्रीय हरित लवादासही सादर केला जाणार आहे. मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांचा विषय अगोदरच हरित लवादासमोर गेलेला आहे. कॅसिनो जहाजांनी सांडपाणी व अन्य घाण मांडवी नदीत सोडू नये म्हणून शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे; कारण राष्ट्रीय हरित लवादापर्यंत हा विषय पोहोचला असून लवादाने याविषयी आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांच्या याचिकेची दखल घेतलेली आहे. राज्य सरकारचे पर्यावरण खाते, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही यापूर्वी कॅसिनो व्यावसायिकांना काही सूचना केल्या आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने दर तीन महिन्यांनी मांडवी नदीतील पाण्याचे नमूने घ्या व तपासून पाहा, अशी सूचना गोव्याच्या शासकीय यंत्रणांना केली आहे. त्यानुसार मांडवीतील पाणी तपासले जाते. गेल्या २४ आॅक्टोबर रोजी सरकारच्या पर्यावरण खात्याचे संचालक श्रीनेत कोटवाले, एनआयटीचे सहअध्यापक डॉ. सुरेश मिक्कीली, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मुख्य संशोधक डॉ. पी. वेथामनी व ज्येष्ठ संशोधक डॉ. दरबार रे, कॅप्टन आॅफ पोर्ट खात्याचे तांत्रिक अधीक्षक स्टीफन ब्रागांझा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव लेविन्सन मार्टिन्स व पर्यावरणविषयक अभियंते विजय कानसेकर यांनी मिळून मांडवी नदीतील पाण्याची, तसेच काही कॅसिनोंचीही पाहणी केली. चाचणीअंती व अभ्यासाअंती या टीमने गेल्या आॅक्टोबरमध्ये कोणता अहवाल तयार केला हे यापूर्वी कधीच स्पष्ट झाले नव्हते. आता यापुढे हा अहवाल हरित लवादासमोर उघड होणार आहे. तथापि, माहिती हक्क कायद्याखाली याचिकादारास हा अहवाल प्राप्त झाला आहे. कॅसिनोंच्या मध्यभागाकडील मांडवीतील पाणी, मांडवी नदीच्या वरील भागातील पाणी व नदीच्या खालील भागातील पाणी असे तीन ठिकाणचे नमूने या तज्ज्ञांच्या टीमने १७ आॅक्टोबर रोजी हे नमूने घेतले. त्या वेळी तीनही नमून्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ‘फेकल कॉलिफॉर्म’ आढळून आले. तज्ज्ञांनी सही केलेल्या अहवालाची प्रत ‘लोकमत’कडे आहे. कॅसिनोंमुळेच हे प्रमाण वाढले, असा निष्कर्ष मात्र अहवालात काढला गेलेला नाही. (खास प्रतिनिधी)