मंडली चित्रपट इफ्फीतील आयसीएफटी - युनेस्कोस्को गांधी पदकाच्या स्पर्धेत
By पूजा प्रभूगावकर | Updated: November 25, 2023 17:13 IST2023-11-25T17:12:10+5:302023-11-25T17:13:34+5:30
सदर चित्रपट इफ्फीतील प्रतिष्ठेच्याआयसीएफटी - युनेस्कोस्को गांधी पदकाच्या स्पर्धेत सहभागी झाला आहे.

मंडली चित्रपट इफ्फीतील आयसीएफटी - युनेस्कोस्को गांधी पदकाच्या स्पर्धेत
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: ‘मंडली’ हा एका रामलीला कलाकाराच्या जीवनातील नैतिक आणि सामाजिक मूल्यांचा शोध घेणारा चित्रपट आहे. सदर चित्रपट इफ्फीतील प्रतिष्ठेच्याआयसीएफटी - युनेस्कोस्को गांधी पदकाच्या स्पर्धेत सहभागी झाला आहे.
मंडली या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश चतुर्वेदी ओम व निर्माते प्रशांत कुमार गुप्ता यांनी इफ्फीनिमित माध्यमांशी संवाद साधला. हा चित्रपट मुन्शी प्रेमचंद यांच्या रामलीला या कथेपासून प्रेरित आहे.या चित्रपटातून मनोरंजक पद्धतीने संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे चतुर्वेदी ओम यांनी सांगितले.
ओम म्हणाले, की पारंपारिक लोक कलाकारांना मिळणारे अल्प उत्पन्न आणि त्यांचा संघर्ष याविषयी आहे.या चित्रपटात खऱ्या रामलीला कलाकारांकडून काम करून घेण्याचा प्रयत्न केला असून, तरुणांना आकर्षित करतील असे मनोरंजनाचे घटक जोडले आहेत. त्यामुळे चित्रपट अधिक प्रभावी झाला असून या चित्रपटाच्या निमिताने रामलीला कलाकारांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना अधिक चांगला मोबदला मिळेल .चित्रपटाच्या संकल्पनेबाबत विस्तृत संशोधन केले असून रामलीला या कलेचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.