शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
4
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
5
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
6
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
7
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
8
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
9
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
10
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
11
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
12
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
13
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
14
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
15
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
16
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
17
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
18
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
19
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
20
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

महायुतीस कॉँग्रेस अनुकूल

By admin | Updated: November 15, 2015 01:41 IST

मडगाव : कॉँग्रेस पक्ष महायुतीच्या विरोधात नाही; मात्र गोवा प्रदेश कॉँग्रेस भाजपशी संधान बांधलेल्या व भाजपची बी टीम

मडगाव : कॉँग्रेस पक्ष महायुतीच्या विरोधात नाही; मात्र गोवा प्रदेश कॉँग्रेस भाजपशी संधान बांधलेल्या व भाजपची बी टीम असलेल्या पक्षांशी तसेच अपक्षांशी महायुती करणार नाही. कॉँग्रेस गोव्यातील धर्मनिरपेक्ष लोकांशी महायुती करून येणाऱ्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देण्यास सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन गोवा प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी येथे केले. येथे कॉँग्रेसने आयोजिलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात सहिष्णुतेची शपथ या सभेत घेण्यात आली. या वेळी व्यासपीठावर लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन, रवी नाईक, प्रतापसिंग राणे व दिगंबर कामत हे कॉँग्रेसचे पाच माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच खासदार शांताराम नाईक, आमदार चंद्रकांत कवळेकर, पांडुरंग मडकईकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी आमदार फिलीप नेरी रॉड्रिगीस, मोती देसाई, सुभाष फळदेसाई आदी मान्यवरही उपस्थित होते. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष किमान पन्नास टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. निवडणुकीत उतरण्यास तयार असलेल्यांनी लोकसंपर्क साधून आपली शक्ती सिद्ध करावी, असे फालेरो यांनी सांगितले. जुन्याजाणत्यांनी पक्षात नवी जान फुंकण्यास मदत करावी, असे फालेरो म्हणाले. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आपल्याकडे जादूची छडी नाही; मात्र सर्वांनी एकत्रित काम केल्यास भाजपची मक्तेदारी आपण सहज तोडू शकतो. गोव्यात व भारतात असहिष्णुता वाढीस लागण्यास भाजपचे सरकार जबाबदार आहे. परदेशात जाऊन महात्मा गांधींच्या शांतीचा उपदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात मात्र मौनव्रत घेऊन बसल्याची टीका फालेरो यांनी केली. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे खाण उद्योगात असलेल्या सुमारे नव्वद हजार लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. भाजपने राज्यातील लोकांची फसवणूक केलेली आहे. या राज्यातील प्रत्येक माणसावर सुमारे एक लाखाचे कर्ज काढून भाजप राज्य चालवीत असल्याची टीका फालेरो यांनी केली. गोव्याची व देशाची आर्थिक स्थिती दयनीय झालेली असून देशाला व राज्याला वाचविण्यासाठी मतदारांनी आपल्या चुकीची दुरुस्ती करून कॉँग्रेसला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन फालेरो यांनी केले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे म्हणाले की रात्र वैऱ्याची आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन खोटारडेपणाने सत्ता हासील केलेल्यांना हरविण्याची वेळ आलेली आहे. लोकपाल, लोकायुक्तसाठी छाती पिटणारे आता गप्प का? भाजप सरकारने कुंभकर्णाची झोप घेतलेली असून दक्षिण गोव्यातील लोकहितार्थ आपण सुरू केलेले जिल्हा इस्पितळ प्रकल्प, कदंब वाहतूक प्लाझा व गैरपारंपरिक ऊर्जा प्लाझा सारखे प्रकल्प भाजप सरकारने शीतपेटीत टाकल्याचा आरोप मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केला. गोमंतकीयांमधे असलेली ठिणगी पेटविण्याची वेळ आलेली आहे. लोकविरोधी सरकारला घरी पाठविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यावा, असे आवाहन कामत यांनी केले. या वेळी बाबू आजगावकर व इतरांचीही भाषणे झाली. कॉँग्रेस पक्षाने असहिष्णुतेच्या विरोधात शपथ घेतली. विकासाच्या विरोधात असलेल्या असहिष्णुतेच्या विरोधात लढा देण्याची व गोव्याच्या संस्कृतीच्या व मूल्यांच्या रक्षणासाठी लढा देण्याची शपथ या वेळी घेण्यात आली. (प्रतिनिधी)