पुण्यातील 'माफिया' जीपला पणजी पोलिसांकडून दंड; वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई
By वासुदेव.पागी | Updated: December 28, 2023 15:33 IST2023-12-28T15:32:13+5:302023-12-28T15:33:16+5:30
बर प्लेटच्या जागी माफिया असे लिहिलेली पाटी लावून फिरणाऱ्या जिपला पणजी वाहतूक पोलिसांनी अडवून दंड आकारला.

पुण्यातील 'माफिया' जीपला पणजी पोलिसांकडून दंड; वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई
पणजी: नंबर प्लेटच्या जागी माफिया असे लिहिलेली पाटी लावून फिरणाऱ्या जिपला पणजी वाहतूक पोलिसांनी अडवून दंड आकारला. ही जीप महाराष्ट्रात नोंदणी झालेली आहे. एम एच ०१ वायए ३६२० क्रमांकची जीप पणजीत क्रमांक पाटीच्या जवळ माफिया असा नाम फलक लावून जात असताना कुणीतरी पाहिले आणि याची माहिती पोलिसांना दिली.
पणजी वाहतूक पोलीस स्थानकाचे निरीक्षक चेतन सावलेकर यांनी ही जीप आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अडविली आणि त्या गाडीची सर्व कागदपत्रे तपासली. ही जीप पुणे येथे नोंदणी झालेली आहे. वाहनाची इतर सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत. शिवाय विमा, फिटनेस आणि इतर कागदपत्रे आहेत. परंतु इतके सर्व असताना नंबर पाटिच्या जवळ माफिया म्हणून लिहून मिरवीण्याची काय गरज होती हे त्यांनाच ठाऊक. या माफिया पाटीमुळे वाहनाची नंबर पाटी व्यवस्थित दिसत नव्हती, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला. गोव्यातील एका माणसाने ती गाडी महाराष्ट्रातून मागवली होती अशी ही माहिती देण्यात आली.
दरम्यान पोलिसांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. विशेषतः मद्यपी चालकांवर कारवाई केली जात आहे. जागोजागी पोलीस अल्कोमीटर घेऊन उभे दिसत आहेत. नववर्षाच्या प्रारंभी मोठ्या प्रमाणावर गोव्यात पर्यटकांचा ओघ सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी. नशा करून कुणी वाहने चालू नयेत आणि अपघाताला आमंत्रण देऊ नये यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस मुख्यालयातून देण्यात आली.