शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक 2024: ‘मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन’ संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:16 IST

काही कार्यकर्ते तटस्थ तर काही भाजपच्या पराभवासाठी लढणार

पणजी: राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्थापन केलेली एसटी मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फुट पडली आहे. संघटनेचे काही कार्यकर्त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदे घेऊन येत्या निवडणूकीत आम्ही तटस्थ भूमिका बजावणार असे सांगितले. तर या संघटनेचा राजीनामा दिले रामा काणकोणकर रुपेश वेळीप, साेयरु वेळीप यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आम्ही भाजप उमेदवाराविरोधात काम करणार. राज्यातील १ लाख ८० हजार एटी समाजाची जनता आमच्या सोबत आहे असे म्हटले आहे.   

रामा काणकाेणकर म्हणाले, मिशन पॉलिटिकल संघटनेत आता काही आरजी पक्षाचे कार्यकर्ते घुसले आहेत. त्यांनी याला राजकीय वळण  दिले आहे. आरजी ही भाजपची बी टीम आहे हे पूर्ण जनतेला माहित आहे. आम्ही गेली २० वर्षे आरक्षणासाठी लढा देत आहोत. आमच्या अनेक सदस्यांनी यासाठी जीवदानही दिले. त्यामुळे आम्ही आमचा हक्क मिळवल्याशिवाय  राहणार नाही. आझाद मैदानावर आम्ही उपाेषण केले त्यावेळी हजारो लाेक आझाद मैदानावर जमा झाले होते. एवढे असून आता या संघटनेच्या काही ीसदस्यांनी निवडणूक तटस्थ भूमिका घेतो असे सांगणे हे चुकीचे आहे. आम्ही या संघटनेचा राजीनामा दिला तरी आम्ही आमचे कार्यसोडणार नाही. आम्ही येत्या निवडणूकीत लाेकांना भाजप विरोधात मते मारायला सांगणार आहे.

भाजपने दक्षिण गोव्यात एसटी समाजाच्या महिला उमेदवाराला उमेदवारी देणार असे सांगितले होते. पण आता भाजपने एका उद्योजक महिलेला उमेदवारी दिली. एसटी समाजाची फसवणूक केली आहे. भाजप प्रत्येकवेळी फसवणूक करत आहे. त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही असेही यावेळी रामा काणकोणकर म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४