शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांप्रमाणे मलाही कला अकादमी तेवढीच महत्त्वाची; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2024 12:45 IST

अकादमीला गतवैभव मिळवून देण्याचा विश्वास.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केवळ कलाकारांनाच कला अकादमीची काळजी आहे असे नाही. त्यांच्याइतकीच माझ्यासाठीही अकादमी महत्वाची आहे, असे मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. अकादमीची वास्तू ४० वर्षे जुनी होती. त्यामुळे त्याचे नूतनीकरण करणेही तेवढेच गरजेचे होते. मी अकादमीच्या कामाचा पूर्ण आढावा घेतला आहे. अकादमीला गतवैभव मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी 'लोकमत'ला सदिच्छा भेट दिली. कला अकादमीच्या विषयाबाबत विचारले असता ते म्हणाले, 'अकादमीबाबत विनाकारण आरोप करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अकादमीत गळती लागली होती. ती केवळ एका एसीमधील गळती होती. तसेच एका छोट्या खोलीतील सिलिंग पडल्याने गळती लागली. संपूर्ण कला अकादमीला गळती लागल्याचे जे बोलले जाते, ते अत्यंत चुकीचे आहे. त्याचप्रमाणे गेल्या पावसात जो खुल्या रंगमंचाचा भाग कोसळला, तोदेखील खूप जुना होता. त्यामुळे आता पुन्हा हा खुला रंगमंच बांधण्यात येणार आहे.'

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सध्या अकादमीत डागडुजीचे काम सुरू आहे. तसेच जिथे गळती लागली, तिथे पाहणी करुन उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण अकादमीची पाहणी संबंधितांना करायला लावली आहे.'

स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीवासियांना खूप त्रास झाला, याची जाणीव मला आहे. मला हेही मान्य आहे की १०० टक्के पूर्तता नाही. मोठ्या प्रमाणावर कामे पूर्णत्वास आली आहेत. उर्वरीत कामेही लवकर पूर्ण होतील. भविष्यात कोणालाही त्रास होणार नाही, याचा विचार करुनच स्मार्ट सिटी योजनेतील कामांची आखणी केली आहे.

स्मार्ट सिटीची कामे सोपी नव्हती

मुख्यमंत्री म्हणाले की, 'पणजी शहरात स्मार्ट सिटी योजनेची कामे करणे सोपे नव्हते. जेव्हा पुढच्या २५ वर्षांचा विचार करून कामे हाती घेण्यात येतात, तेव्हा सर्वकाही पूर्ववत व्हायला थोडासा वेळ लागतोच. त्यातही जर पूर्वीचे, खूप जुने शहर असेल, तर त्या शहरात खोदकाम करुन अधिक चांगल्या सुविधा देणे हे कधीही कठीण काम ठरते. पणजीतील सांडपाणी वाहिनी खूप जुनी होती. ती पूर्ण बदलण्यात आली, जेणेकरुन भविष्यात लोकांना त्रास होणार नाही. उर्वरीत कामांची पुर्तता लवकरात लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतLokmatलोकमत