राज्यात आता लाईट हाउस पर्यटन
By Admin | Updated: October 31, 2015 02:21 IST2015-10-31T02:19:46+5:302015-10-31T02:21:25+5:30
पणजी : देशाच्या किनारपट्टीत एकूण १६९ लाईट हाउसेस असून या सर्वांचा वापर करून लाईट हाउस पर्यटन करण्याचा निर्णय

राज्यात आता लाईट हाउस पर्यटन
पणजी : देशाच्या किनारपट्टीत एकूण १६९ लाईट हाउसेस असून या सर्वांचा वापर करून लाईट हाउस पर्यटन करण्याचा निर्णय केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालय व पर्यटन मंत्रालयाने मिळून घेतला आहे. गोव्यातील आग्वाद लाईट हाउसचाही या योजनेत समावेश करण्यात आला असून राज्यात यापुढे लाईट हाउस पर्यटन विकसित केले जाईल, असे राज्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले.
गुरुवारी आपली मुंबईत केंद्रीय जहाजोद्योग मंत्री गडकरी यांच्यासोबत बैठक झाली. गोव्यात एकूण दोन लाईट हाउसेस आहेत. त्यापैकी आग्वादचे लाईट हाउस पर्यटन व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचे ठरले आहे. यासाठी आरएफक्यू जारी झाला आहे. आम्ही साधनसुविधा पुरविणार नाही, थोडी जमीन उपलब्ध करून देऊ. कंत्राटदार कंपनीने लाईट हाउसच्या परिसरात ध्वनी व्यवस्था, लाईट शो, रेस्टॉरंट आदी पर्यटनास पूरक गोष्टींची सोय करावी, असे अपेक्षित असल्याचे परुळेकर म्हणाले. देशाच्या पूर्ण किनारपट्टीत अशा प्रकारे लाईट हाउस पर्यटन विकसित करण्याची केंद्राची योजना असल्याचे परुळेकर यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)