गोव्याचे जीवन हा चित्रपटाचा एक भाग

By Admin | Updated: May 24, 2014 00:26 IST2014-05-24T00:25:08+5:302014-05-24T00:26:18+5:30

गोव्याचे जीवन हा चित्रपटाचा एक भाग

Life of Goa is a part of the film | गोव्याचे जीवन हा चित्रपटाचा एक भाग

गोव्याचे जीवन हा चित्रपटाचा एक भाग

मडगाव : गोवा ही कलाकारांची खाण आहे. कलाकारांची भूमी आहे व गोव्याचे जीवन हा चित्रपटाचा एक भाग आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी केले़ मडगाव येथील रवींद्र भवनात गोवा मनोरंजन सोसायटीतर्फे आयोजित बालचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सातार्डेकर, राजा खेडेकर व संदीप कुंडईकर उपस्थित होते. डिसोझा म्हणाले की, आजच्या मुलांमध्ये खूप टॅलंट आहे, कला आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी दामू नाईक यांची निवड योग्य असून ते गोवा मनोरंजन सोसायटीला योग्य दिशा देऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण गोव्यात प्रथमच चौथा बालचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होत असून यात गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष नाईक यांनी मुलांना प्रमुख स्थान दिले आहे. महोत्सवात चित्रपटांबरोबर आयोजित केलेल्या कार्यशाळांना फार महत्त्व आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना अशा कार्यशाळांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक यांनी गोव्यात २००४ पासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला असून गोव्यातील कलाकारांना त्याचा फायदा झाला याला महत्त्व आहे. बालचित्रपट महोत्सवात आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये मुलांनी सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाईक यांनी केले. हा बालचित्रपट महोत्सव २५ मे पर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यन शिरोडकर व सौम्या लोटलीकर यांनी केले. स्वागत दामोदर नाईक यांनी केले, तर आभार राजन सातार्डेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Life of Goa is a part of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.