शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खानकडून लुटीची वसुली करा, एसआयटीचे खाण खात्याला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 22:02 IST

बेकायदेशीररीत्या पावर आॅफ अ‍ॅटर्नी घेऊन बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करण्याच्या प्रकरणात ट्रेडर इम्रान खानकडून लुटीची वसुली करून घेण्याची सूचना करणारे पत्र विशेष तपास पथकाने खाण खात्याला लिहिले आहे.

पणजी: बेकायदेशीररीत्या पावर आॅफ अ‍ॅटर्नी घेऊन बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करण्याच्या प्रकरणात ट्रेडर इम्रान खानकडून लुटीची वसुली करून घेण्याची सूचना करणारे पत्र विशेष तपास पथकाने खाण खात्याला लिहिले आहे. त्यात ९० कोटींची वसुली आणि खाण लीज काढून घेण्याची शिफारस आहे.एसआयटीकडून मंगळवारी खाण खात्याला पत्र सादर करण्यात आले असून त्यात इम्रान खानवर खाण खात्याकडून जी कारवाई करायला हवी आहे त्या बद्दल लिहिले आहे. एमएमआरडी कायद्यानुसार एखाद्याला देण्यात आलेले खाण लीज हे लीजधारकाच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबियांच्या नावावर होण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. ती न करता त्या खाणीचा पावर आॅफ एटोर्नी कुणीही देऊ शकत नाही आणि घेऊ शकत नाही. परंतु इम्रान खानने ते केले आहे. इमिलिया फ्रिग्रेडो यांच्या खाण लिजाची बेकायदेशीरपणे पावर आॅफ एटॉर्नी घेऊन उत्खनन केल्यामुळे हे मंजूर झालेले खाण लीज काढून घेण्याची शिफारस केली आहे. लीजाच्या करारात तशी तरतूत असल्याचेही म्हटले आहे.फिग्रेडो यांच्या नावाने खाण लीज असताना इम्रान आपल्या खात्यातून रॉयल्टी फेडून कसा घेऊन शकतो ? आणि ती खाण खाते कसे फेडून घेऊ शकते असे प्रश्नही त्यात करण्यात आले आहेत. वनखात्याचा व इतर आवश्यक परवाने न घेता आतापर्यंत बेकायदेशीरपणे उत्खनन करून इम्रानने कोट्यवदी रुपयांचा व्यवहार केला आहे. हे पैसे वसूल करून घेण्यात यावे असे पत्रात म्हटले आहे. इम्रानच्या बँक आॅफ इंडियाच्या मडगाव शाखेत असलेल्या आणि एसआयटीकडून गोठविण्यात आलेल्या ९० कोटी रुपयांच्या ठेवींची माहितीही एसआयटीकडून देण्यात आली आहे.दरम्यान एसआयटीकडून तसे पत्र मिळाल्याची माहिती खाण खात्याच्या सूत्रांकडून देण्यात आली. त्यावर योग्य कारवाईही करण्यात येणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले. इम्रान कान याला कोट्यवधी रुपयांच्या खनिज घोटाळा प्रकरणात एसआयटीकडून अटक करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची जामीनवर सुटका केली होती.वसुलीचे अधिकार खाण खात्यालादरम्यान वसुलीचे अधिकार हे खाण खात्यालाच आहेत. खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणा-या एसआयटीला वसुलीचे अधिकार नाहीत. एसआयटी केवळ गुन्ह्या संबंधीचा तपास करील असे पत्रात म्हटले आहे. त्यासाठी दाखला म्हणून ओरिसा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाची प्रतही एसआयटीने सोबत जोडली आहे.

टॅग्स :goaगोवा