पथदीपांची जागा घेणार एलईडी बल्ब
By Admin | Updated: November 21, 2015 02:10 IST2015-11-21T02:06:51+5:302015-11-21T02:10:41+5:30
पणजी : राज्यभर पारंपरिक पद्धतीचे पथदीप बदलण्यात येतील. त्याऐवजी एलईडी वीज दिव्यांची सोय केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडून मंजूर करण्यात आला.

पथदीपांची जागा घेणार एलईडी बल्ब
पणजी : राज्यभर पारंपरिक पद्धतीचे पथदीप बदलण्यात येतील. त्याऐवजी एलईडी वीज दिव्यांची सोय केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडून मंजूर करण्यात आला.
केंद्र सरकारच्या एका योजनेनुसार राज्यभरातील सर्व पथदीप फुकटात बदलण्याची व त्याजागी उच्च दर्जाच्या एलईडी वीज दिव्यांची सोय होणार आहे. यामुळे १८ कोटी ९० लाख रुपयांची वार्षिक बचत होईल. दहा वर्षे एलईडी वीज दिव्यांच्या व्यवस्थेची देखभाल करण्याचा खर्चही केंद्रीय यंत्रणा उचलणार आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
वीज खात्यात कंत्राट पद्धतीवर ६० वीज अभियंते नियुक्त केले जाणार आहेत. तसेच महिला व बाल कल्याण खात्यात विविध योजनांच्या अंमलबजावणीचे काम करण्यासाठी ४० फिल्ड अधिकारी कंत्राट पद्धतीवर नेमले जाणार आहेत. मंत्रिमंडळाने हे दोन्ही प्रस्ताव शुक्रवारी मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अनिवासी गोमंतकीयांना जर गोव्यातील विकासकामांसाठी अर्थसाहाय्य किंवा देणगी द्यायची असेल, तर यापुढे ती सरकारच्या एनआरआय विभागाकडून स्वीकारली जाणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाने ‘माझा गाव, माझा गोवा’ या नावाची एक योजना मंजूर केली. विद्यालयासाठी प्रयोगशाळा,
(पान २ वर)