शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुटमधून मजुरांंना हाकलले

By admin | Updated: August 26, 2014 01:21 IST

बार्देस : कळंगुट मतदारसंघात गैरकृत्ये, तसेच गुन्हे वाढण्यास परप्रांतीय मजूर जबाबदार असल्याचा दावा करत या मजुरांना हुसकावून लावण्याची मोहीम आमदार मायकल लोबो

बार्देस : कळंगुट मतदारसंघात गैरकृत्ये, तसेच गुन्हे वाढण्यास परप्रांतीय मजूर जबाबदार असल्याचा दावा करत या मजुरांना हुसकावून लावण्याची मोहीम आमदार मायकल लोबो यांनी हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवासी व पोलिसांच्या मदतीने कळंगुट, टिटो येथे जमलेल्या सुमारे ७00 लोकांची तेथून हकालपट्टी करण्यात आली. यापुढेही ही मोहीम अशीच चालू ठेवणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले आहे. रविवारी प्रभूवाडो येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका १९ वर्षीय प. बंगालच्या युवकाने फूस लावून तिचे अपहरण केल्याने सध्या या भागातील वातावरण तापले आहे. परप्रांतीय लोक गोव्यात येतात आणि आपले बस्तान ठोकतात. चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार अशी कृत्ये करतात व आपल्या गावी निघून जातात. यांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे, असे ही मोहीम राबवणाऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी लोबो म्हणाले की, कळंगुट मतदारसंघात परप्रांतीय कामगार व इतर लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्याबाबत आपले काही म्हणणे नाही; पण हे लोक आपली ओळख सांगणारी कागदपत्रे स्थानिक पोलीस स्थानकांत देत नाहीत. तसेच जे घरमालक भाडेकरू ठेवतात, तेही काळजी घेत नाहीत. त्यामुळे या लोकांचे आयते फावते. हे लोक चोऱ्या, खून, बलात्कार करून गोवा सोडून पळून जातात. सकाळी ७ ते ९.३० च्या दरम्यान कळंगुट, टिटो येथील शांतादुर्गा मंदिराजवळील बसस्टॉपवर कॉलेज व कामाला जाणाऱ्या मुली बससाठी थांबतात. या वेळेत सुमारे ५०० ते ७०० कामगार घोळक्याने येथे उभे असतात. त्यांचा त्रास स्थानिकांना होतो. या विरोधात कळंगुट पंचायतने कारवाई करणे आवश्यक आहे, असे आमदार लोबो म्हणाले. रविवारी ज्या युवकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले, तो युवक भाड्याने राहत होता. मात्र, घरमालकाने पूर्ण नाव, पत्ता, फोटोही घेतला नव्हता. घरमालकाला त्याचे रामू एवढेच नाव माहीत आहे. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेणे कठीण झाले आहे, असे लोबो म्हणाले. सोमवारी सकाळी मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी पोलीस निरीक्षक राजेशकुमार, उपनिरीक्षक नितीन हळर्णकर व इतर पोलिसांच्या मदतीने परप्रांतीय कामगारांना हाकलून लावले. त्यातील काहींना पोलिसांनी ताब्यातही घेतले. (प्रतिनिधी)