शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

मित्र असावा ऐसा नेता, पंचतारांकीत उद्योजक नव्हे तर कार्यकर्तेच होते "पर्रीकरांची दोस्तकंपनी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 22:42 IST

दोघे मित्र.. दोघांच्या वाटा वेगळय़ा, एक जण पत्रकारितेत संपादक तर दुसरा राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर.

पर्रीकरांबद्दलचा हा लेख त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त लोकमतने प्रसिद्ध केला होता. पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुन्हा प्रकाशन. 

दोघे मित्र.. दोघांच्या वाटा वेगळय़ा, एक जण पत्रकारितेत संपादक तर दुसरा राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर. पण मैत्री हा दोघांना एकत्र आणणारा समान धागा. अर्थात हे आहेत दिलीप करंबेळकर आणि मनोहर पर्रीकर. दोघांच्या खूप वर्षाच्या मैत्रीबद्दल आठवणी लिहिल्या आहेत साप्ताहिक विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी..

मैत्री 

आणीबाणी संपल्यानंतर माझी गोव्यामध्ये जिल्हा प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. गोव्यातील काम करणारे कार्यकर्ते तरुण, उत्साही होते. तिथल्या कामात अधिक मोकळेपणा होता. गोव्याचा एकूण स्वभाव आतिथ्यशील आहे. माझ्यापूर्वी दुर्गानंद नाडकर्णी हे प्रचारक होते आणि कोणत्याही कुटुंबाचा सहजपणा घटक बनणं हा त्यांचा सहज स्वभावाचा भाग होता. अशाच प्रकारे म्हापशाचे पर्रीकर यांचे घर संघाशी जोडले गेलेले होते. मी गोव्यात प्रचारक असताना मनोहर मुंबईत आय.आय.टी.मध्ये शिकत होता. परंतु त्याचा मोठा भाऊ अवधूत हाही संघाचा चांगला कार्यकर्ता होता. त्यामुळे स्वभाविकच म्हापशात गेल्यावर पर्रीकरांच्या घरी जाणे व्हायचे. 

मी प्रचारक म्हणून १९०८० साली थांबता थांबता मनोहर गोव्यात आला आणि गोव्यातच व्यवसाय सुरू करण्याचे त्याने निश्चित केले. आज आश्चर्य वाटते, पण त्या काळात माझा व मनोहरचा परिचय वरवरचा राहिला, कारण त्या काळात आम्ही फारसे एकत्र नव्हतो. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर प्रचारकाने आपल्या पूर्वीच्या कार्यक्षेत्रत रस घेऊ नये, असा संघाचा अलिखित संकेत आहे. नव्या प्रचारकाला जुन्या प्रचारकाच्या संबंधाचा त्रास होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु तिथे प्रचारक आले. मिलिंद करमरकर आणि गोव्यातील सगळा सहकारी कार्यकर्ता यांच्यात एवढे खेळीमेळीचे आणि मोकळे वातावरण होते, की गोव्यातून मुंबईला आल्यानंतरही माझा गोव्याशी संपर्क सुरू राहिला. त्या काळात मनोहर संघचालक होता. बहुतेक तो सर्वात कमी वयाचा संघचालक असावा. 

भारतात 1951 नंतर जनसंघाचे काम सुरू झाले आणि ते क्रमाक्रमाने वाढत गेले. परंतु गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा हिंदूंचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे गोव्यात जनसंघाची आणि नंतर भारतीय जनता पक्षाची फारशी वाढ झाली नाही. परंतु 1984 नंतर भाजपचे काम गोव्यात वाढण्यासाठी मनोहर पर्रीकर आणि श्रीपाद नाईक या दोघांना संघचालक पदावरून मुक्त करून भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सांगण्यात आले. या दरम्यान संघ, राजकारण आणि वाचन यामुळे मनोहरची माझी मैत्री वाढत गेली. मनोहरकडे बुद्धिमत्ता आहे. काम करण्याची प्रचंड उर्मी, वैचारिक झेप त्याच्याकडे आहे. परंतु यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक विलक्षण पारदर्शकता आहे. 

मनोहरला जे वरवर ओळखतात, त्यांना माझ्या या वाक्याचे आश्चर्य वाटेल. राजकीय डावपेचात मनोहर तज्ज्ञ असल्यामुळे जे लोक त्याच्या भूमिकेऐवजी डावपेचाकडे पाहात असतात त्यांना मनोहरने घेतलेले निर्णय आकस्मिक व गोंधळात पाडणारे वाटत असतात. परंतु हे निर्णय घेत असताना आपल्या पक्षाचा प्रभाव कसा वाढेल, याच्या विचाराचा आराखडा त्याच्याकडे तयार असतो. त्यात निर्माण होणा:या शक्यतांचा विचार त्याने केलेला असतो आणि कोणत्या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायचा याचेही त्याचे गणित मनात तयार झालेले असते. त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण झाल्यास तो पटकन त्या निर्णयास येतो. त्याच्या भोवतीच्या सहका-यांना मात्र गोंधळल्यासारखे वाटते, त्यामुळे मनोहरला जाणून घ्यायचे असेल तर त्याला व्यक्ती म्हणून जाणून घेता आले पाहिजे. त्याच्या मनात सातत्याने पक्षवाढीचा विचार चालू असतो, तो जाणता आला तर मनोहरच्या वागण्यातले गूढ उलगडू शकते, असे मला वाटते आणि कदाचित तोच आमच्या मैत्रीचा एकमेकांना बांधून ठेवणारा धागा असावा. 

मनोहर आणि श्रीपाद नाईक यांनी भाजपची सूत्रे हाती घेतली तेव्हा गोव्यातले भाजपचे काम अगदी नगण्य होते. श्रीपाद हा लोकांच्या भावनिक सबंधांना महत्त्व देणारा, तर मनोहर हा ‘टास्क मास्टर.’ अवघ्या दहा-बारा वर्षात भाजपाने गोव्यात सत्तेची सूत्रे हाती घेतली. यामागे मनोहरच्या परिश्रमाचा, संघटनकौशल्याचा आणि डावपेचांचा मोठा वाटा होता. सत्तेवर आल्यानंतर मनोहरने गोव्याच्या विकासात अक्षरश: स्वत:ला झोकून दिले. गोवा स्वतंत्र झाल्यापासून जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढी त्याच्या काळात झाली. त्याची विकासाची संकल्पना केवळ वीज, पाणी, रस्ते एवढीच नव्हे तर मानवी विकासाचा आशयही त्यात होता. त्यामुळे वृद्धांपासून विद्याथ्र्यार्पयत सर्वासाठी विविध योजना त्याने राबविल्या. शाळांच्या अनुदानात वाढ केली. सर्व विद्यार्थ्यांना संगणक देण्याचा निर्णय ऐतिहासिकच होता. विद्याथ्र्याना संगणक देणारे गोवा हे भारतातील पहिले राज्य आणि या सर्व योजनांच्या मागे मनोहरचे डोके होते. त्याने मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अनेक गोष्टी सांगता येतील. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बुद्धीमान, कार्यक्षम व स्वच्छ प्रतिमा असलेला मुख्यमंत्री म्हणून त्याला अेाळखले गेलेच, पण महत्त्वाचे म्हणजे त्या सहजतने आणि साधेपणाने तो त्या काळात राहिला. अनेक मंत्री, मुख्यमंत्री आपल्या कार्यकाळात पंचतारांकीत हॉटेलात शासकीय खर्चाने राहतात. मनोहर शासकीय निवासस्थान किंवा कोणाही मित्रच्या घरी नि:संकोचपणो, सहजपणो राहतो. हे मित्र कोणी ‘पंचतारांकीत’ मित्र नाहीत, तर संघाचे, पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्याच्या वागण्यातील सहजता आणि साधेपणा हे आमच्या मैत्रीतील दुसरे कारण असावे. आम्ही त्या काळात एकमेकांशी खूप चर्चा केली असे नाही, परंतु अनेकवेळा असे लक्षात येते की, फारशी चर्चा न करता किंवा एकमेकांशी विचारविनिमय न करता अनेकदा आमचे मत एकसारखे असते आणि त्यामुळे आम्हा दोघांनाही एखादी गोष्ट समजून सांगण्यात फारसे शब्द खर्ची करावे लागत नाहीत. आपल्या विरोधकांनी आपल्यावर टीका करत राहणो याचा मनाला फारसा त्रस होत नाही, परंतु आपले लोकच जेव्हा गैरसमज करून घेतात, तेव्हा त्यातून होणारा मनाचा कोंडमारा विलक्षण असतो. परंतु त्याच्या पत्नीच्या मेधाच्या आजारपणात आणि जेव्हा गैरसमजातून निर्माण झालेल्या अंतर्गत संघर्षात त्याच्या डोळ्यांतून आलेले अश्रू मी पाहिलेले आहेत. मेधा आणि मनोहर यांचा प्रेमविवाह होता. मनोहरच्या  वागण्यात मऊपणा, मृदुता याचा अभाव आणि मेधाचे वागणो हेही त्याला अपवाद नव्हते. 

आयुष्यात काही गोष्टी कधी न विसरणा:या असतात. मेधाला ब्लड कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांकडून पक्के निदान करण्यात आले. त्यानंतर हे सगळे फोनवरून मला सांगत असताना मनोहरच्या आवाजातला कातरपणा आजही स्पष्टपणो कानाला जाणवतो. पण त्या वाक्यांनी मनोहर सावरला. आपल्या नेहमीच्या व्यावसायिक कार्यक्षमतेने रुग्णालयात प्रवेश घेणो आणि नंतरच्या उपचारांची व्यवस्था करण्याच्या मागे लागला. त्या उपचाराचा मेधावर काही उपयोग न होता ती त्याच्या जीवनातून निघून गेली. परंतु तिने मनोहरच्या जगण्याला आंतरिक बळ दिले आहे. त्याचे सामर्थ्य सहजपणो सांगता येणो अवघड आहे. राजकीय नेते सहजपणो ज्या विचारांना बळी पडतात, त्यापासून मेधाने मनोहरला वाचविले आहे, अशी मनोहरची धारणा असावी, असे मला वाटते. या गोष्टी व्यक्त करणो शक्य असूनही त्या शब्दाविणा जाणून घ्याव्या लागतात. 

राजकीय क्षेत्रत काम करणाऱ्यांची विश्वासार्हता आज नष्ट झाली आहे, त्यामुळे राजकारणात राहण्याकरता, टिकण्याकरता मनोहरने डावपेच वापरले, त्या सर्वाचे मला वाटते, त्यापेक्षा वेगळे विश्लेषण करता येणे शक्य आहे. परंतु, त्याच्या अंतर्मनात वाहणारा लोकहिताचा आणि संघसंस्काराचा अंत:प्रवाह एवढा शुद्ध आणि प्रवाही आहे, की त्यानेच मनोहरला त्याच्या राजकीय कोशातून योग्य मार्गावर ठेवले आहे. आज अखिल भारतीय राजकारणात मनोहरबद्दल चर्चा सुरू झाली. तो अखिल भारतीय राजकारणात जाईल की नाही? गेला तर यशस्वी होईल की नाही यासंबंधी वेगवेगळी मतं आहेत. परंतु एखादी व्यक्ती अशा गणितात न बसणारी असते, यावर लोकांचा विश्वास नसतो. त्यामुळे मनोहरची दिल्लीतच काय, पण कुठेच लॉबी नाही. त्याचा गट नाही, त्याचे आवडते किंवा नावडते लोक नाहीत. त्याची विवेकबुद्धी, लोकहितवादी बुद्धी आणि संघाकडून घेतलेले संस्कार हेच त्याचे प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत. आणि जोर्पयत हे त्याच्यापाशी आहेत तोर्पयत तो गोव्यात राहिला काय अन् दिल्लीत राहिला काय.. ही चर्चा अर्थशून्य आहे, असे मला वाटते आणि बहुधा त्यालाही तेच वाटत असावे. 

(‘समदा’च्या दिवाळी 2009 मधील मैत्र विशेषांकातून साभार) 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरDeathमृत्यूgoaगोवाFriendship Dayफ्रेंडशिप डे