मराठी शाळांसाठी अखेर २७४ शिक्षकांची नियुक्ती

By Admin | Updated: July 8, 2015 01:43 IST2015-07-08T01:43:45+5:302015-07-08T01:43:54+5:30

मराठी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकविण्यासाठी राज्य सरकारने रद्दबातल ठरलेली शिक्षकांची सर्व पदे पुनरुज्जीवित करून मंगळवारी २७४

Last year 274 teachers were appointed for Marathi schools | मराठी शाळांसाठी अखेर २७४ शिक्षकांची नियुक्ती

मराठी शाळांसाठी अखेर २७४ शिक्षकांची नियुक्ती


सद्गुरू पाटील ल्ल पणजी
मराठी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकविण्यासाठी राज्य सरकारने रद्दबातल ठरलेली शिक्षकांची सर्व पदे पुनरुज्जीवित करून मंगळवारी २७४ शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती केली. त्यामुळे या शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यासंदर्भात ‘लोकमत’ने गेल्या महिन्यात दिलेले वृत्त खरे ठरले.
हे सर्व इंग्रजी शिक्षक सरकारी मराठी शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकवणार आहेत. पर्रीकर सरकार अधिकारावर असताना दोन वर्षांपूर्वी राज्यातील मराठी शाळांमध्ये इंग्रजी शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला होता. त्या वेळी शिक्षणाच्या माध्यमाचा वाद गाजत होता. डायोसेझनच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारने अनुदान दिले, तर राज्यातील मराठी व कोकणी माध्यमाच्या शाळा अडचणीत येतील, अशी भीती सर्वत्र व्यक्त होत होती. मराठी शाळांमध्ये मुलांना इंग्रजी शिकविले जात नाही. त्यामुळे त्या शाळांमध्ये मुलांना न पाठविता पालक मुलांना इंग्रजी शाळांमध्ये पाठवितात, असाही मुद्दा मांडला जात होता. यावर उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी सरकारने इंग्रजी शिक्षक नेमण्याचे ठरविले. तथापि, गेल्या दोन वर्षांत नियुक्ती न झाल्याने पदे रद्दबातल ठरली. त्या वेळी जे उमेदवार या पदांसाठी आले होते, त्याच उमेदवारांपैकी २७४ उमेदवार आता निवडले गेले. गेल्याच महिन्यात प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली होती. ‘लोकमत’ने त्या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी संपर्क साधून वृत्त दिले. काही अधिकाऱ्यांनी त्या वेळी अजून २७४ शिक्षकांची निवड झालेलीच नाही, अशी लपवाछपवीही केली होती.

Web Title: Last year 274 teachers were appointed for Marathi schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.