पालिकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस
By Admin | Updated: October 8, 2015 01:45 IST2015-10-08T01:45:31+5:302015-10-08T01:45:53+5:30
पणजी : पालिका निवडणुकीला आता रंग चढू लागला असून अकरा पालिकांच्या १५९ प्रभागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकरिता अर्ज भरण्यासाठी गुरुवार

पालिकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस
बुधवारी आणखी २२५ अर्ज
पणजी : पालिका निवडणुकीला आता रंग चढू लागला असून अकरा पालिकांच्या १५९ प्रभागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकरिता अर्ज भरण्यासाठी गुरुवार, दि. ८ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे उरलेले सर्व उमेदवार गुरुवारी अर्ज भरतील. बुधवारी २२५ अर्ज दाखल झाले. २५ आॅक्टोबर रोजी पालिका निवडणूक होत असून निकाल २७ रोजी जाहीर होतील. २0१७च्या विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पालिका निवडणुकीकडे पाहिले जात असून सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. (प्रतिनिधी)