नावेलीतून विदेशी चलन लंपास

By Admin | Updated: July 8, 2014 01:19 IST2014-07-08T01:15:26+5:302014-07-08T01:19:37+5:30

मडगाव : नावेलीत चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञाताने एका बंगल्यात चोरी करून विदेशी चलन लंपास केले. चोरीला गेलेल्या चलनाची भारतीय चलनात एकूण ४ लाख ८८ हजार अशी किंमत आहे.

Lantpay foreign currency from Dastli | नावेलीतून विदेशी चलन लंपास

नावेलीतून विदेशी चलन लंपास

मडगाव : नावेलीत चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. रविवारी मध्यरात्री अज्ञाताने एका बंगल्यात चोरी करून विदेशी चलन लंपास केले. चोरीला गेलेल्या चलनाची भारतीय चलनात एकूण ४ लाख ८८ हजार अशी किंमत आहे. या चोरी प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. गेल्या पंधरवड्यातील नावेली भागातील ही चौथी चोरी आहे. एकाही प्रकरणाचा छडा पोलीस लावू शकलेले नाहीत. वाढत्या चोऱ्यांचा धसका नागरिकांनी घेतला असून, या भागात सध्या भीतीचे वातावरण आहे.
नावेली येथील क्रुझनगर या भागात रविवारी चोरट्याने रॉडनी डिमेलो यांच्या बंगल्याला लक्ष्य करून आतील रोकड लंपास केली. डिमेलो हे विदेशात जहाजावर कामाला असून, २९ जून रोजी ते गोव्यात आले होते. रात्री ते आपल्या कुटुंबीयांसमवेत झोपले असताना चोरट्याने बाल्कनीचे दार तोडून आत शिरून ही चोरी केली. बेडरुमधील ड्रॉवर फोडून ७ हजार ६०० डॉलर्स व ४० युरो लंपास केले.
मध्यरात्री डिमेलो यांना जाग आली तेव्हा त्यांना घरात एक अनोळखी व्यक्ती वावरत असल्याचे दिसून आले होते. काळ्या रंगाचा कुरळ्या केसांचा तसेच साधारणत: पाच फूट सहा इंच उंचीचा हा इसम होता. मात्र, स्वप्न पडले असावे, असे समजून ते पुन्हा झोपी गेले. नंतर सकाळी त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे आढळून आल्यानंतर यासंबंधी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चोरीच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, त्यातून पोलिसांच्या हाती फारसे काही गवसले नाही. भादंसंच्या ४५७ व ३८० कलमांखाली पोलिसांनी चोरीची ही घटना नोंदवून घेतली आहे. उपनिरीक्षक गिरेंद्र नाईक तपास करत आहेत.
या भागात झालेल्या चोरी प्रकरणांत चोरट्यांची चोरीची पद्धत एकसारखीच असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. चोरी प्रकरणाचा तपास चालू असल्याची माहिती उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. (प्र्रतिनिधी)

Web Title: Lantpay foreign currency from Dastli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.