लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री
By Admin | Updated: November 8, 2014 15:23 IST2014-11-08T15:13:05+5:302014-11-08T15:23:18+5:30
लक्ष्मीकांत पार्सेकर यांची गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ८- केंद्रात जाणा-या मनोहर पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांची गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. आमदारांच्या बैठकीत पार्सेकरांच्या नावावर एकमत झाल्याने राजीव प्रताप रूडी यांनी पार्सेकर यांच्या नावाची घोषणा केली. आज संध्याकाळी पार्सेकर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना पार्सेकर आरोग्यमंत्री होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा उद्या( रविवार) विस्तार होणार असून पर्रीकर यांना केंद्रात महत्वाचे पद सांभाळावे लागणार आहे. त्यांना संरक्षणमंत्रीपद दिले जाईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पार्सेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.