लईराई जत्रोत्सव हा आनंद सोहळा: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2024 11:00 IST2024-05-15T10:59:59+5:302024-05-15T11:00:35+5:30
सर्वांना सुखसमृद्धी लाभावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रार्थना केल्याचे सांगितले.

लईराई जत्रोत्सव हा आनंद सोहळा: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी शिरगाव येथील श्रीदेवी लईराईचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यानी देवी लईराईचा जत्रोत्सव म्हणजे गोमंतकीय जनतेचा जीवाभावाचा जत्रोत्सव हा आनंदाचा, मांगल्याचा सोहळा आहे. गोमंतकीय जनतेबरोबरच इतर भागांतूनही लोकांची मोठी गर्दी होते. सर्वांना सुखसमृद्धी लाभावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रार्थना केल्याचे सांगितले.
जनतेला सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, आयुष्य, तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना देवीची कृपा लाभो, अशा प्रकारची प्रार्थना आपण देवीच्या चरणी केल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
यावेळी देवस्थान अध्यक्ष गणेश गावकर आणि इतरांनी त्यांचे स्वागत केले. देवीचा उत्सवात हजारो व्रतस्थ धोंड आणि भाविकांनी सहभागी होत मनोभावे सेवा केली.