शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

प्रशासनाला शिक्षा कोण करील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 07:54 IST

मुळात अहवालाबाबत लपवाछपवी का केली जात होती, हे कळायला मार्ग नाही.

शिरगाव येथे श्री लईराई देवीची जत्रा शेकडो वर्षांपासून होत आहे. हजारो धोंडगण व भाविक वेक पोर्तुगीज काळापासून आतापर्यंत दरवर्षी जत्रेत सहभागी होतात. कधीच चेंगराचेंगरीची घटना घडली नव्हती किंवा तत्सम दुर्घटना होऊन कधी बळी गेले नव्हते. ती दुर्दैवी गोष्ट यावेळी घडली. गोव्याच्या प्रशासनाला लागलेला हा डाग आहे, असेच म्हणावे लागेल. पोलिस यंत्रणेचे हे सपशेल अपयश आहे, हे नमूद करावेच लागेल. कालच्या मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चौकशी अहवाल जाहीर केला. अहवाल पूर्णपणे लोकांसाठी, प्रसारमाध्यमांसाठी उपलब्ध न करता अहवालातील निवडक व महत्त्वाचा भाग सरकारने जाहीर केला आहे. 

मुळात अहवालाबाबत लपवाछपवी का केली जात होती, हे कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समितीचे जे निष्कर्ष जाहीर केले, ज्या उपाययोजना जाहीर केल्या, त्याबाबत थोडा ऊहापोह होणे गरजेचे आहे. महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सरकारने चौकशी करून घेतली. चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी खरे म्हणजे एखाद्या निवृत्त हायकोर्ट न्यायाधीशामार्फत करून घ्यायला हवी होती. अधिक कडक अहवाल आला असता. सत्तर-ऐंशी हजारांची गर्दी जत्रेवेळी जमते आणि ती हाताळण्यासाठी कोणतीच उपाययोजना प्रशासनाने केलेली नसते. साध्या पोलिस शिपायांवर सारे काही सोपवून अनेक वरिष्ठ कुठे तरी गायब झालेले असतात. 

सहा निष्पाप भाविकांचा बळी जातो आणि ७०-८० भाविक जखमी होतात. काहीजण तर अत्यंत गंभीर जखमी होतात. याबाबत सरकारने उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपाधीक्षक किंवा अन्य अधिकाऱ्यांना मिळून एकूण आठ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संदीप जॅकीस समितीचा अहवाल आल्यानंतर या नोटिसा पाठविण्यात आल्या. तत्पूर्वी त्यांची बदली करण्यात आली. वास्तविक ज्या दिवशी चेंगराचेंगरी होऊन भाविकांचा जीव गेला, त्याच दिवशी काहीजणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हायला हवा होता. स्वर्गीय मनोहर पर्रीकर जर मुख्यमंत्रिपदी असते तर निश्चितच तसा (कल्पेबल होमिसाइड) गुन्हा नोंद झाला असता. आता प्रशासन असे झालेय की, एकमेकांना संरक्षण द्यायचे आणि जो अधिकारी आपल्याला आवडत नाही, त्यालाच फक्त शिक्षा द्यायची. इतरांना सांभाळून घ्यायचे.

ज्यांचा जीव गेला, त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांचे अर्थसाह्य जाहीर करायचे, दोन दिवस अश्रू गाळायचे, एवढेच आताच्या सरकारला कळते, असे खेदाने म्हणावे लागेल. त्या दिवशी पहाटे गर्दीत सापडलेल्या जखमी भाविकांच्या किंकाळ्या कधीच विसरता येणार नाहीत. खनिज खाण कंपन्यांना लीज देताना लईराई देवीचे मंदिरदेखील लीज क्षेत्रात ठेवणारे राज्यकर्ते आपल्याकडे आहेत. चेंगराचेंगरीची घटना ही पूर्णपणे मानवनिर्मिती आहे, म्हणजेच प्रशासनाच्या गलथानपणाची ती निर्मिती आहे. 

चेंगराचेंगरी होणे व भाविकांचे बळी जाणे हे पूर्णपणे रोखता आले असते. एवढी गोष्ट तरी चौकशी समितीच्या अहवालातून पूर्णपणे कळून आली आहे. जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधीक्षकांनी शिरगावच्या जत्रेचा विषय गंभीरपणे घेतलाच नव्हता. शिरगावला रस्ते एकदम छोटे आहेत. दुकाने अर्धी रस्त्यावर येतात, हे स्थानिकांना ठाऊक होते; पण प्रशासनाला कसे कळले नाही? परिसरावर नियंत्रण ठेवणे किंवा आपत्ती ओढवलीच तर युद्धपातळीवर मदतकार्य करता येईल एवढी तत्परता ठेवणे यापैकी काहीच प्रशासनाला जमले नाही. कधी देवस्थान समितीवर, तर कधी धोंडांवर खापर फोडून आपण मोकळे व्हावे, असे प्रशासनाला वाटले होते. 

हिंदू समाजाच्या श्रद्धा, भावना याबाबत प्रत्येकवेळी अनेकजण गलथानपणा दाखवत आले आहेत. हेच जर काँग्रेस सरकारच्या काळात घडले असते तर त्याला काहीजणांनी वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला असता. काहींनी त्याकडे धार्मिक दृष्टिकोनातूनही पाहिले असते. ड्रोनद्वारे सुरक्षा ठेवणार, एक हजार पोलिस जत्रेवेळी उपस्थित असतील वगैरे घोषणा सरकारने केल्या होत्या. प्रत्यक्षात सरकारने ही जत्रा गंभीरपणे घेतली नव्हती हे कळून आलेच. आता काही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून मग वरवरच्या कारवाईचा सोपस्कार पार पाडला जाईल. लोक एकदा विषय विसरले की, पुन्हा तेच अधिकारी नव्याने आपापल्या जागी प्रस्थापित होतील. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार