शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 21:08 IST

डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

वास्को: गोवा पोलीसात भरती असलेल्या महीला पोलीस शिपाई शैला गवंडर आज (दि.२६) सकाळी कामासाठी दुचाकीने वास्को पोलीस स्थानकावर येत असताना माटवे दाबोळी भागात झालेल्या अपघातात तिचा जागीच दुर्देवी अंत झाला. २३ वर्षीय शैला ही तरुणी चिंबेल येथील रहिवासी असून मागच्या दोन वर्षापासून ती वास्को पोलीस स्थानकात शिपाई म्हणून कार्यरत होती.पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८.४० च्या सुमारास सदर अपघात झाला. शैला गवंडर ही महिला पोलीस शिपाई सकाळी वास्को पोलीस स्थानकावर कामाला येण्यासाठी ‘ऍक्टीव्हा’ दुचाकीने (क्र: जीए ०७ एए ५८८३) निघाली होती. जेव्हा ती दुचाकीने माटवे दाबोळी येथील जासिंन्तो बेट बाहेरील रस्त्यावर पोहोचली, त्यावेळी तिची दुचाकी रस्त्यावर घसरून दुचाकीसहीत ती रस्त्यावर खाली कोसळली. शैला दुचाकीसहीत रस्त्यावर कोसळण्यावेळी तिच्या दुचाकीची अन्य एका दुचाकीला धडक बसल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी पुढे दिली.

सकाळी मुसळधार पाऊस पडल्याने रस्ता ओला झाल्याने यामुळे तिची दुचाकी घसरली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सदर अपघात घडल्यानंतर शैलाला त्वरित उपचारासाठी चिखली येथील उपजिल्हा इस्पितळात नेले, मात्र येथे आणण्यापूर्वीच ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शैला काही वर्षापूर्वीच गोवा पोलिसात शिपाई म्हणून रुजू झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी देऊन दोन वर्षापासून ती वास्को पोलीस स्थानकावर कामाला असल्याचे सांगितले. वेर्णा पोलिसांनी सदर अपघाताचा तसेच शैलाच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवून दिला. तिच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर तो तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलेला असल्याचे पोलीसांनी सांगितले. सदर प्रकरणाचा वेर्णा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघातDeathमृत्यू