शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्वहीन कॉंग्रेस आहे, सरकार नव्हे, भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 22:15 IST

गोव्यातील सरकार नेतृत्वहीन झाले नाही तर गोव्यात कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी केला. त्यामुळेच हा पक्ष अद्याप आपला अध्यक्ष निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. 

पणजी - गोव्यातील सरकार नेतृत्वहीन झाले नाही तर गोव्यात कॉंग्रेस नेतृत्वहीन झाली असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी केला. त्यामुळेच हा पक्ष अद्याप आपला अध्यक्ष निवडू शकत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला. भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काब्राल यांनी कॉंग्रेसचे राज्यपालांना दिलेले निवेदन म्हणजे फसलेला स्टंट असल्याचे सांगितले. सरकार अस्तित्वात नसल्याचा आरोप करणारा कॉंग्रेस नेते आता सरकार नेतृत्वहीन असल्याचे सांगतात. गोव्याचे सरकार नेतृत्वहीन नाही. मुख्यमंत्री आरोग्याच्या कारणास्तव विदेशात उपचार घेत असले तरी त्यांनी नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीद्वारे राज्यकारभार सुरू आहे. या उलट कॉंग्रेसची स्थिती झालेली आहे. ते गोव्यात प्रदेशाध्यक्ष ठरवू शकत नाहीत आणि आरोप मात्र सरकारवर करतात असे काब्राल यांनी सांगितले. तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीला घटनात्मक आधार नसल्याचा शांताराम नाईक यांचा दावाही त्यांनी फेटाळला. विधानसभा अधिवेशनाच्या मुद्यावर बोलताना काब्राल म्हणाले की आता अधिवेशन जुनमध्ये घेतले जाईल. त्यापूर्वी अधिवेशनाची गरज नाही. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी ७ दिवसांपूर्वीच आपण बोललो होतो. त्यांची प्रकृती सुधारत आहे. उपचारांना ते दाद देत आहेत. गोव्यात येण्या एवढी त्यांची परिस्थिती सुधारल्यानंतर ते गोव्यात परततील असेही ते म्हणाले.  माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. खाण बंदीमुळे लोकांचा रोजगार जात आहे. कंपन्याकडून कामगारांना काढणे थांबवावे. आणखी काही काळ धीर धरावा. खाण उद्योग सुरू होण्याच्या बाबतीत खूप आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस