कृष्णा लवादाकडे कर्नाटकच्या कागदपत्रे तपासणीचे काम सुरू

By Admin | Updated: September 23, 2014 02:21 IST2014-09-23T02:20:56+5:302014-09-23T02:21:44+5:30

म्हादई प्रकरण : गोवा सरकारने केली होती मागणी

Krishna Lavadada has started the investigation of Karnataka papers | कृष्णा लवादाकडे कर्नाटकच्या कागदपत्रे तपासणीचे काम सुरू

कृष्णा लवादाकडे कर्नाटकच्या कागदपत्रे तपासणीचे काम सुरू

पणजी : कळसा, भंडुरा या म्हादई नदीच्या उपनद्या मलप्रभेत वळविण्याच्या संदर्भातील कर्नाटकाच्या कागदपत्रांची तपासणी गोवा सरकारच्या वकिलांनी दिल्लीत कृष्णा लवादाकडे सुरू केली आहे.
एकूण ६00 ते ७00 इतकी ही कागदपत्रे असून पहिल्या टप्प्यात जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांनी या दस्तऐवजांची तपासणी केली होती. आता दुसऱ्या टप्प्यात वकील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. त्यानंतर लवादासमोर पुढील मांडणी कशी करावी, हे ठरणार आहे.
अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यासंबंधी वकील तसेच अभियंत्यांची बैठक घेऊन राज्याचे धोरण स्पष्ट केले, तसेच यासंबंधी कसे पुढे जावे याबाबत मार्गदर्शन केले.
मलप्रभा नदीत पाण्याचे दुर्भीक्ष असल्याचा कर्नाटक सरकारचा दावा आहे. कर्नाटकने सौंदत्ती येथे नवलतीर्थ धरण बांधले. या धरणातून जलसिंचनाची मागणी पूर्ण करणे त्या सरकारच्या आवाक्याबाहेर गेले.
नवलतीर्थ धरणाला गळती लागली आहे त्यावर उपाययोजना करण्याची आधी गरज आहे. ते सोडून म्हादईचे ७.५६ टीएमसी पाणी मलप्रभेत वळविण्याचा डाव कर्नाटक सरकारने रचला आहे.
मलप्रभा नदीचा उगम कणकुंबी येथे होतो. बागलकोट जिल्ह्यात पुडलसंगम येथे मलप्रभा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. दिल्लीत कृष्णा लवादाकडे हा पाणी तंटा चालू असून गोवा सरकारने आपल्याला सर्व कागदपत्रे दाखवली जावीत, अशी विनंती केली होती.
ती लवादाने मान्य केल्यावर कागदपत्रे तपासण्याची वरील प्रक्रिया सुरू झाली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Krishna Lavadada has started the investigation of Karnataka papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.