शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कोविंद यांची आमदारांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2017 2:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्कवास्को : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आपल्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी गोव्यात आले. या वेळी त्यांच्यासमवेत

लोकमत न्यूज नेटवर्कवास्को : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आपल्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी गोव्यात आले. या वेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय महामार्ग आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांचे स्वागत केले़ त्यानंतर कोविंद यांनी बोगमाळो बीच रिसॉर्टमध्ये प्रयाण केले़ या ठिकाणी भाजपचे आमदार तसेच सरकारमधील घटक पक्षांच्या आमदारांशी त्यांची चर्चा आयोजित करण्यात आली होती़ या वेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई, मगो पक्ष नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, दक्षिण गोव्याचे खासदार अ‍ॅड़ नरेंद्र सावईकर तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजय वर्गीस व्यासपीठावर उपस्थित होते़ मनोहर पर्रीकर यांनी उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले़ या वेळी भाजपचे मुरगावचे आमदार मिलिंद नाईक वगळता इतर सर्व आमदार, गोवा फ ॉरवर्डचे आमदार तथा मंत्री विनोद पालयेकर, जयेश साळगावकर, मगोपचे आमदार तथा मंत्री मनोहर आजगावकर, दीपक पाऊसकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे, प्रसाद गावकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव उपस्थित होते़ आपण घटनेशी बांधिल असून लोकशाही तंत्र पाळून राष्ट्राचे कामकाज हाताळणाऱ कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आपले काम पारदर्शी असेल, असा विश्वास त्यांनी आमदारांशी बोलताना व्यक्त केला, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़