नेरूल येथे माळ्यावर चाकू हल्ला
By Admin | Updated: October 5, 2014 01:15 IST2014-10-05T01:15:40+5:302014-10-05T01:15:50+5:30
पर्वरी : नेरूल, दांदेडी येथील एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्याच्या पोटात चाकू भोसकल्याची तक्रार शिवोली येथील आंजेलो जुझे फर्नांडिस यांनी पर्वरी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.

नेरूल येथे माळ्यावर चाकू हल्ला
पर्वरी : नेरूल, दांदेडी येथील एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्याच्या पोटात चाकू भोसकल्याची तक्रार शिवोली येथील आंजेलो जुझे फर्नांडिस यांनी पर्वरी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ रोजी नेरूल, दांदेडी येथील कोको मारी या बंगल्यात काम करीत असलेल्या सुकुरीन सिमोईश या महिलेच्या मेक्सन रोझारीओ नावाच्या मुलाने बंगल्यात प्रवेश केला त्या वेळी तेथे कामाला असलेल्या राजेंद्र (वापी) बेहरा (२५,ओरिसा) याने त्यास हटकले त्यावरून बाचाबाची होऊन मेक्सन याने रागाने राजेंद्रच्या पोटात स्वयंपाक घरातील चाकू आणून खुपसला. रक्तबंबाळ अवस्थेत राजेंद्र यास गोमेकॉत उपचारासाठी नेण्यात आले. पर्वरी पोलिसांत या प्रकरणाची आंजेलो यांनी तक्रार नोंदविली.
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ माजिक यांनी घटनेचा पंचनामा केला व संशियत आरोपी मेक्सन याच्यावर भा.दं.सं. ३०७ कलमाखाली गुन्हा नोंदविला. आरोपीला न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता पाच दिवसांचा रिमांड देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ब्रेंडन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माजिक पुढील तापास करीत आहेत. (प्रतिनिधी)