किंग मोमोची आजपासून राजवट..!
By Admin | Updated: February 6, 2016 03:06 IST2016-02-06T03:01:33+5:302016-02-06T03:06:06+5:30
पणजी : राज्यात आजपासून चार दिवस किंग मोमोची राजवट सुरू होणार आहे. ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देत सायंकाळी चार वाजता

किंग मोमोची आजपासून राजवट..!
पणजी : राज्यात आजपासून चार दिवस किंग मोमोची राजवट सुरू होणार आहे. ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देत सायंकाळी चार वाजता पणजीतील जुन्या सचिवालयाकडून किंग मोमोचा चित्ररथ निघणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवस राज्यातील विविध भागांत कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येईल.
कार्निव्हलच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासूनच दिवजा सर्कल ते कला अकादमीपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. शहरात येणाऱ्या गाड्यांची वाढती संख्या पाहता सरकारने कार्निव्हलचा मार्ग बदलायला हवा, अशी प्रतिक्रिया नागरिकांत व्यक्त करण्यात येत आहे.
कार्निव्हल महोत्सवासाठी जुने सचिवालय, फेरीबोट धक्का, कांपाल इत्यादी ठिकाणावर आसन व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था करण्यासाठी तीन ते चार दिवस कामगार रस्त्यांवर वावरत आहेत. या कामगारांमुळे वाहतुकीस अडथळा होतो.