शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

बीफ खाणाऱ्यांना चौकात फाशी द्या

By admin | Updated: June 15, 2017 02:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्करामनाथी-फोंडा : बीफ खाणे स्टेटस सिंबल मानणाऱ्यांना म्हणजेच आईचे मांस खाणाऱ्यांना चौकात फाशी दिली पाहिजे, त्यांचे शरीर

लोकमत न्यूज नेटवर्करामनाथी-फोंडा : बीफ खाणे स्टेटस सिंबल मानणाऱ्यांना म्हणजेच आईचे मांस खाणाऱ्यांना चौकात फाशी दिली पाहिजे, त्यांचे शरीर जेव्हा चौकात लटकवले जाईल तेव्हा असे मांस खाण्याचे धाडस पुन्हा कोणी करणार नाही, असा इशारा सनातन धर्म सेवा प्रचार समितीच्या छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील साध्वी सरस्वती यांनी बुधवारी येथे दिला. केंद्र सरकारने गोमातेच्या संरक्षणासाठी विशेष पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.हिंदू जनजागृती समितीच्या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशात त्या बोलत होत्या. २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील विविध संघटनांचे १५० वर प्रतिनिधी अधिवेशनास उपस्थित आहेत. हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी अधिवेशन होत आहे. रामनाथ मंदिरात विद्याधिराज सभागृहात अधिवेशन सुरू झाले. ज्याची भीती होती तसेच नेमके या अधिवेशनात घडले. बहुतेक वक्त्यांनी भावना भडकविणारी प्रक्षोभक भाषणे केली. मुस्लीमद्वेष पसरविणारी भाषणे होती.भारत हिंदू राष्ट्र करूच. ते (मुसलमान) पाकिस्तानात गेले तर ठिक नाहीतर पाकिस्तानही हिंदू राष्ट्र करू, असेही साध्वी सरस्वती यांनी सांगितले. शांततेने चर्चेची वेळ निघून गेलेली आहे, आता हत्यारे उचलावीच लागतील, असा इशारा त्यांनी दिला. हिंदूंनो, घरात शस्त्रे ठेवा नाहीतर येणाऱ्या काळात नाश मोठा होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मुलायम सिंग शब्द उच्चारणे देखील पाप आहे, असे त्या म्हणाल्या.उद्घाटनानंतर साध्वी सरस्वती यांनी माध्यमांशी संवाद साधला. हिंदूंनो, हत्यारे उचला असे त्यांनी केलेल्या आवाहनाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावर त्या म्हणाल्या, तेत्रायुगापासून हिंदू राष्ट्र आहे. ते आज संकटात आहे, त्यामुळे आत्मरक्षणासाठी हिंदूंनी घरात शस्त्रे ठेवली पाहिजेत. हिंदूंच्या देव-देवतांच्या हातातही शस्त्रे आहेत. ही हिंदूंची परंपरा आहे.हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले की, देशाची फाळणी धर्मावर आधारित झाली. त्या वेळी हिंदू राष्ट्र निर्मितीची आशा निर्माण झालेली होती. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनेत घुसडला. परिणामी हिंदू माणसांवर, संस्थांवर अन्याय झाला आणि हिंदू राष्ट्र निर्मितीची आशा दुरावली होती. आता हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे. हिंदू राष्ट्र संकल्पनेवर चर्चा होत आहे. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरदेखील धर्म आणि अधर्म असेच ध्रुवीकरण होत आहे. धर्म आणि अधर्मापैकी आपल्याला एक पक्ष घेतलाच पाहिजे नाहीतर न भुतो-न भविष्यती, अशी हानी होईल. जेएनयू ही देशद्रोह्यांची टोळी, किल्ला आहे, अशी टीका डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केली. ‘भारत तेरे तुकडे होंगे- इन्शाअल्ला, इन्शाअल्ला’ यासारख्या घोषणा जेएनयूमध्ये दिल्या जातात, त्यामुळे आम्ही जेएनयूच्या विरोधात आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीचे गुणगाण गाणारे खूप असले तरी घटनेची अंमलबजावणी केली जाते का, असा प्रश्न त्यांनी विचारला. लोकशाहीत बहुमताने निर्णय घ्यायचे असतात मग ८० टक्के हिंदू असताना त्यांच्या हिताचे निर्णय होत नाहीत. त्यामुळे लोकशाही नाही. लोकशाहीची चेष्टा चालवली आहे. ही लोकशाही खोटी आहे. डावे लोकशाहीचे विरोधक आहेत, असे ते म्हणाले.मशिदी, चर्चविषयी असे बोलता का?मंदिरांच्या राष्ट्रीयीकरणाची भाषा बोलली जाते. मंदिरांच्या संपत्ती ताब्यात घेण्याची चर्चा केली जाते. अशीच चर्चा मशिदी आणि चर्चविषयी करता का, अशी विचारणा डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केली.कटुंब नियोजनाची सक्ती सर्वांना का नाही?सत्तर वर्षांत समान नागरी कायदा का केला नाही, असा प्रश्न डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी विचारला. ते म्हणाले, हिंदूंना सक्तीचे कुटुंब नियोजन, इतरांना मात्र मोकळीक असे का? सरकार घाबरते, ही कसली लोकशाही?सकाळी सहापूर्वी मशिदीवरील ध्वनिक्षेपक लावू नये, असे न्यायालयाने सांगितले. असे ध्वनिक्षेपक हटविण्यास न्यायालयाने सांगूनही सरकार घाबरते. ही कसली लोकशाही? असे डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी विचारले.पत्रकारांनो, ब्ल्यू प्रिंट कसली मागता?ब्रिटिश आणि मुघल येण्यापूर्वी सर्व शास्त्रांनी समृद्ध असे हिंदू राष्ट्रच होते आणि हिंदू राष्ट्र निर्मितीची ब्ल्यू प्रिंट कसली विचारता पत्रकारांनो, असा प्रश्न हिंदू जनजागरण समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी प्रारंभीच केला. अनुनयाच्या आधारावर मुसलमानांना देशात राहता येणार नाही, असे त्यांनी ठणकावले. जनभावना समजून घ्या पत्रकारांनो, विधानांवर जाऊ नका, रणनीती तुम्हाला विचारून ठरवली जात नसते, असा उपदेशही त्यांनी पत्रकारांना केला.गोमाता उलथवेल गोव्याची सत्ताबीफ गोव्याचे अन्न आहे, असे गोव्यातील सत्ताधारी म्हणतात. यांची दोन कवडीची सत्ता गोमाता सेकंदात उलथवून टाकेल, असा इशारा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिला. गोमातेच्या रक्षणाचे वचन सत्ताप्राप्तीनंतर मात्र विसरले, असे ते म्हणाले. हिंदूंची हिटलिस्ट करून गोळ्याकेरळातील हिंदू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या खुन्यांचा शोध घ्यावा, असे सरकारला का वाटत नाही, असा प्रश्न अभय वर्तक यांनी उपस्थित केला. दक्षिण भारतात हिंदूंची हिटलिस्ट करून गोळ्या घातल्या जात आहेत.डॉ. वीरेंद्र तावडे निरपराधगोविंद पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक केलेली आहे. ते निरपराध आहेत. वरून फोन आला आणि त्यांना अटक करावी लागली, असे सांगितले जात आहे. वरून फोन कोण करतोय याची माहिती नाही, असे अभय वर्तक म्हणाले. मग आम्ही म्हणणार हर हर महादेव इसीस देशाच्या चौकटीवर आलेला आहे. नीजाम-ए-मुस्तफा, अल्ला हो अकबर यासारखे नारे मशिदीत दिले जाऊ शकतात, त्यांच्याशी विभाजनवादी शक्ती येथे असताना कसे लढणार? अशी विचारणा करून अभय वर्तक म्हणाले, आम्हीही गप्प बसणार नाही. हर हर महादेव आणि शिवाजी महाराजांचा जयघोष करू.