गोवा सरकारकडून केजरीवालांच्या भेटीवर फक्त पाचशे रुपयांचा खर्च

By Admin | Updated: August 1, 2016 18:09 IST2016-08-01T18:09:50+5:302016-08-01T18:09:50+5:30

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलिकडे दोनवेळा गोव्याला भेट दिली. तथापि, त्यांच्या गोवा भेटीवर गोवा सरकारला केवळ पाचशे रुपयांचाच

Kejriwal's visit to the Goa government will cost only five hundred rupees | गोवा सरकारकडून केजरीवालांच्या भेटीवर फक्त पाचशे रुपयांचा खर्च

गोवा सरकारकडून केजरीवालांच्या भेटीवर फक्त पाचशे रुपयांचा खर्च

लाइन लोकमतपणजी, दि. १ - आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलिकडे दोनवेळा गोव्याला भेट दिली. तथापि, त्यांच्या गोवा भेटीवर गोवा सरकारला केवळ पाचशे रुपयांचाच खर्च करावा लागला, अशी माहिती विधानसभा अधिवेशनावेळी समोर आली आहे.गोवा विधानसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. नुवेचे आमदार मिकी पाशेको यांनी लेखी स्वरुपात केजरीवाल यांच्या गोवा भेटीविषयी प्रश्न मांडला होता. शिष्टाचार खात्याचे मंत्री दिलीप परुळेकर यांनी याविषयी उत्तरात सांगितले, की केजरीवाल यांच्या निवासाची सोय सरकारी विश्रमधामात केली होती पण त्यांनी या निवास व्यवस्थेचा वापर केला नाही. त्यांच्यासाठी सरकारने वाहनाचीही सोय केली होती. तथापि, केजरीवाल यांच्यासाठी सरकारला केवळ पाचशे रुपयांचा खर्च आला. केजरीवाल जेव्हा सभेनिमित्त प्रथम गोव्यात आले तेव्हा दाबोळी विमानतळावर त्यांचे सरकारकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्या पुष्पगुच्छाची किंमत पाचशे रुपये होती.(प्रतिनिधी)

Web Title: Kejriwal's visit to the Goa government will cost only five hundred rupees