कामत यांचे आंदोलन मागे
By Admin | Updated: March 31, 2015 02:02 IST2015-03-31T01:55:10+5:302015-03-31T02:02:02+5:30
पणजी : गोवा विद्यापीठाच्या कॅण्टिनमध्ये जेवण योग्य दर्जाचे मिळत नसल्याने आणि तेथील कंत्राटदारानेही बदनामीकारक तक्रार केल्याने गेले

कामत यांचे आंदोलन मागे
पणजी : गोवा विद्यापीठाच्या कॅण्टिनमध्ये जेवण योग्य दर्जाचे मिळत नसल्याने आणि तेथील कंत्राटदारानेही बदनामीकारक तक्रार केल्याने गेले काही दिवस कॅण्टिनमध्ये खाली बसून जेवून संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी प्रतिकात्मक आंदोलन केले. सोमवारी दुपारी ते विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत पडले व त्यामुळे त्यांच्या पोटात आणि खांद्यात प्रचंड कळा आल्या. त्यानंतर त्यांनी आंदोलन तात्पुरते थांबवले आहे.
दरम्यान, गोवा विद्यापीठातील कॅण्टिनची सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात पाहणी केली. त्या वेळी ‘मिसब्रॅण्डेड’ अन्नपदार्थ आढळले. त्यामुळे कॅण्टिन चालकास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच अधिकाऱ्यांनी कॅण्टिनमधून मक्याच्या पिठाचा नमूनाही घेतला होता, असे संचालक सलिम वेलजी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आता आम्ही पुढे काही कारवाई करण्याची आपल्याला गरज वाटत नाही. आता विद्यापीठाचे कॅण्टिन व नंदकुमार कामत यांच्यातीलच हा विषय आहे, असे वेलजी म्हणाले. (खास प्रतिनिधी)