शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील कळंगुट परिसरात वर्षभरात अमली पदार्थांचे 31 गुन्हे नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 18:07 IST

जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात मागील एकाच वर्षात अमली पदार्थ विरोधात ३१ गुन्हे नोंद करुन एकूण ३२ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ३० लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे.

म्हापसा : जगप्रसिद्ध अशा गोव्यातील कळंगुट किनारी भागात मागील एकाच वर्षात अमली पदार्थ विरोधात ३१ गुन्हे नोंद करुन एकूण ३२ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ३० लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्यापूर्वीच्या तीन वर्षाच्या तुलनेत दुप्पट कामगिरी पोलिसांनी एकाच वर्षात नोंद केली आहे. कळंगुट पोलिसांनी २०१४ ते २०१६ या तीन वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थ विरोधात फक्त १६ गुन्हे नोंद केले होते. मात्र संपलेल्या २०१७ च्या वर्षात एकूण ३१ जणांवर गुन्हे नोंद करुन तीन वर्षाचा आकडा मोडीत काढला. नोंद केलेल्या या ३१ गुन्ह्यांत गांजा, चरस, हेरॉईन, कोकेन, एलएसडी, एमडीएमएल सारखे अमली पदार्थ जप्त केले केले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३० लाख रुपयाहून जास्त होत असल्याची माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.  कारवाईत स्थानिक नागरिकांसोबत देश-विदेशातल्या नागरिकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. त्यात ८ स्थानिकांचा, ८ विदेशी नागरिकांचा तसेच १६ इतर राज्यातील नागरिकांचा समावेश होता. विदेशी नागरिकात नायजेरियन नागरिकांचा जास्त प्रमाणावर समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या विरोधांत गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत. अमली पदार्थ विरोधात केलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून अमली पदार्थांचा साठा करणाºया दोन घरांना सिल सुद्धा ठोठावण्यात आलेला. कळंगुट पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाºया कांदोळी या किनारी भागातील एका बंगल्याच्या आवारात सुरु असलेल्या गांजाच्या शेतीवर सुद्धा कारवाई करण्यात आली. कारवाईत १० लाख रुपयांचा गांजा ताब्यात घेऊन नंतर तो नष्ट करण्यात आला. गांजाच्या शेतीवर कारवाई करण्याची परिसरातली तसेच वर्षातली सर्वात मोठी कामगिरी कळंगुट पोलिसांनी केली होती. कळंगुट या किनारी भागातून अमली पदार्थाचे उच्चाटन करण्यास पोलीस कटिबद्ध असल्याचे मत दळवी यांनी व्यक्त केले. या किनारी भागाची व्याप्ती पाहता भागाला भेट देणारे बाहेरील नागरिक या भागात आणून त्याची विक्री करतात. त्यामुळे त्याचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करवा लागत असल्याचे दळवी म्हणाले. अशा लोकांवर कळंगुट पोलीस बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे ते म्हणाले. यावर सर्वत्र जागृती करण्यात येणार असून लोकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन दळवी यांनी केले. या कारवाई सोबत परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव करुन असलेल्या १६ विदेशी नागरिकांवर सुद्धा कारवाई करुन त्यांना अटक करण्यात आले. यात नायजेरियन, रशियन, कझाकिस्तान नागरिकांचा समावेश आहे.      

टॅग्स :Crimeगुन्हाgoaगोवा