कळंगुट सामूहिक बलात्कार सुडापोटी

By Admin | Updated: June 7, 2015 01:30 IST2015-06-07T01:30:17+5:302015-06-07T01:30:20+5:30

पणजी : कळंगुट येथील सामूहिक बलात्कार सुडापोटी करण्यात आल्याचा निष्कर्र्ष पोलीस तपासातून आला आहे. अजय कुशवाह हा या थरार

Kalangat gang rape sudapoti | कळंगुट सामूहिक बलात्कार सुडापोटी

कळंगुट सामूहिक बलात्कार सुडापोटी

पणजी : कळंगुट येथील सामूहिक बलात्कार सुडापोटी करण्यात आल्याचा निष्कर्र्ष पोलीस तपासातून आला आहे. अजय कुशवाह हा या थरार नाट्याचा सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पर्वरी येथील उत्तर गोवा पोलीस मुख्यालयात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक उमेश गावकर यांनी ही माहिती दिली. मुली या एस्कॉर्ट होत्या व त्यांना संशयित अजय कुशवाह याने मनोज नामक संशयिताकडून आणले होते. दोन मुलींवर चार जणांनी बलात्कार केल्याची माहिती गावकर यांनी दिली. अजय कुशवाह याचा अ‍ॅपल मोबाईल हँडसेट आणि दीड हजार रुपये चोरीला गेले होते. हे मनोजचे कारस्थान असल्याच्या संशयावरून अजयने हे बलात्कार नाट्य रचले. अजयच्या चार सहकाऱ्यांनी दोन मुलींवर बलात्कार केला, हे अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून पोलिसांना सांगण्यात आल्याचे अधीक्षक गावकर म्हणाले़
समीर नामक व्यक्तीने मनोजशी संपर्क करून मुली आणण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन मुलींना त्याने पाठवून दिले; परंतु अजय व त्याच्या साथीदारांनी त्यांना आपण पोलीस असल्याचे सांगून वाटेवर अडविले व त्यांचे अपहरण केले. (प्रतिनिधी)

Web Title: Kalangat gang rape sudapoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.