बस उलटून महिला ठार

By Admin | Updated: June 11, 2014 01:19 IST2014-06-11T01:12:24+5:302014-06-11T01:19:22+5:30

वाळपई : आंबेडे-नगरगाव येथे मंगळवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास कदंब बस उलटून सुशीला देऊ गावकर (वय ४२, रा. कोदाळ-सत्तरी) या महिलेचा मृत्यू झाला, तर १८ प्रवासी जखमी झाले.

Just reverse the woman killed | बस उलटून महिला ठार

बस उलटून महिला ठार

वाळपई : आंबेडे-नगरगाव येथे मंगळवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास कदंब बस उलटून सुशीला देऊ गावकर (वय ४२, रा. कोदाळ-सत्तरी) या महिलेचा मृत्यू झाला, तर १८ प्रवासी जखमी झाले.
सकाळी १०.३० वाजता कदंब बस (क्र. जीए ०३, एक्स ००२४) वाळपईहून कोदाळ येथे निघाली. कोदाळ येथे प्रवाशांना उतरून तेथून सव्वाअकराच्या सुमारास वाळपईला येण्यासाठी निघाली. वाटेत बांबर, माळोली-धावे अशा गावांतून प्रवासी घेऊन वाळपईच्या दिशेने येत असताना आंबेडे येथे चालकाचा बसवरचा ताबा सुटला व सुमारे शंभर मीटर अंतरात ठिकठिकाणी धडक देत बस उलटली. बसमध्ये सुमारे पंचवीस प्रवासी होते. त्यापैकी सुशीला गावकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर १८ जण जखमी झाले. जखमींत रेखा माने (वय ४०, वाळपई), तुकान्ना (वाळपई), नीलिमा पार्सेकर (२४, नानोडा), अनिल लाडू गावकर (१२ , देरोडा), गुणवंती गणेश चोर्लेकर (५०, देरोडा), मंगल राम भाटेकर, (२५, नानोडा) मदन चंद्रकांत गावकर (८, नानोडा), चंद्रावती गावकर (३०, नानोडा), सौभद्री जाधव (६०, देरोडा), लक्ष्मण पर्येकर (७५, देरोडा), दीपक गावकर (३०, देरोडा), नारायण सावर्डेकर (८०, कोदाळ), सुनील गावरे (२०, कोदाळ), शंकर मंहती (२८, कोदाळ), रंजना गावकर (देरोडा) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Just reverse the woman killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.